IndiGo Crisis: "आम्हाला माफ करा" अडचणीत सापडलेल्यांची ‘इंडिगो’ने मागितली माफी! प्रवाशांसाठी केली महत्त्वाची घोषणा

Indigo Airlines: इंडिगो एअरलाईनची विमानसेवा विस्कळीत झाल्याने देशभरातील विमानतळांवर प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
IndiGo Flight
IndiGo Flights StatusDainik Gomantak
Published on
Updated on

Indigo Airlines: इंडिगो एअरलाईनची विमानसेवा विस्कळीत झाल्याने देशभरातील विमानतळांवर प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या अभूतपूर्व संकटाबद्दल इंडिगोने शुक्रवारी (5 सप्टेंबर) जाहीररित्या प्रवाशांची माफी मागितली. "आम्ही तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. यापुढे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ." असे इंडिगोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले. तसेच, विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही देखील दिली.

एकाच दिवसात 700 हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द

शुक्रवारी इंडिगोने (IndiGo) 700 हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द केली. कंपनीने सांगितले, आज रद्द होणाऱ्या विमानांची संख्या सर्वाधिक होती. उद्यापासून सेवेत सुधारणा करण्यासाठी सर्व सिस्टीम आणि वेळापत्रक अपडेट केले जाईल.

"आम्ही खरोखर मनापासून माफी मागतो. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तुम्हाला किती त्रास सहन करावा लागत आहे, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे." असेही कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले. हे संकट एका रात्रीत संपणार नसले तरी यादरम्यान तुम्हाला मदत करण्यासाठी आणि शक्य तितक्या लवकर सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करु," असे आश्वासनही कंपनीने दिले.

IndiGo Flight
Indigo Flight Status: असुविधा के लिए खेद है! इंडिगोची विमानसेवा विस्कळीतच, गोव्यात 11 उड्डाणे रद्द, कंपनीने मागितली माफी

कंपनीने निवेदनात पुढे म्हटले की, ज्या प्रवाशांची Passenger) उड्डाणे रद्द झाली आहेत, त्यांना त्यांनी मूळ तिकीट ज्या माध्यमातून बुक केले होते, त्याच माध्यमातून परतावा दिला जाईल. याशिवाय, 5 ते 15 डिसेंबर 2025 या कालावधीतील प्रवासासाठी फ्लाइट रद्द करण्याच्या आणि पुनर्निर्धारित करण्याच्या सर्व विनंत्यांवर कंपनीकडून संपूर्ण सूटही दिली जात आहे.

डीजीसीएच्या समन्वयाने 'शॉर्ट-टर्म' रद्द

तसेच, विमानतळांवरील गर्दी कमी करण्यासाठी आणि कामकाज पूर्ववत करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालय आणि डीजीसीएच्या समन्वयाने तात्पुरत्या स्वरुपात काही उड्डाणे रद्द करण्यात येत आहेत, असे इंडिगोने स्पष्ट केले. इंडिगोने प्रवाशांना विनंती केली की, जर तुमचे विमान रद्द झाले असेल, तर कृपया विमानतळावर येऊ नका.

या संकटाच्या काळात कॉल सेंटरमधील प्रतीक्षा वेळ वाढला असल्याचे देखील कंपनीने सांगितले. मात्र, प्रवाशांना लवकर प्रतिसाद देण्यासाठी संपर्क केंद्रांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले. परतावा आणि पुन्हा बुकींमध्ये मदत करण्यासाठी इंडिगोचा एआय असिस्टंट '6Eskai' चा देखील वापर केला जात आहे.

IndiGo Flight
IndiGo Share Market Loss: विमानं रद्द करणं इंडिगोला पडलं महागात! एका दिवसात तब्बल 7160 कोटींचा फटका, बाजारमूल्यात मोठी घसरण

प्रवाशांचा विश्वास परत मिळवणार

कामात सुधारणा करण्याचे आश्वासन देत इंडिगोने शेवटी स्पष्ट केले की, "गेल्या 19 वर्षांत तुम्ही आमच्यावर जो विश्वास आणि प्रेम दाखवले ते परत मिळवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु." या निवेदनामुळे आता इंडिगो आपल्या सेवा किती लवकर पूर्ववत करते आणि प्रवाशांचा विश्वास पुन्हा जिंकते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com