Black Widow: सहा वर्षात 17 विवाह, मन भरताच पतीचा खून; 17 खून करणारी भारताची ब्लॅक विडो

पंजाबमधील महिला सिरीयल किलर जिला भारताची ब्लॅक विडो म्हणतात,
Crime News
Crime NewsDainik Gomantak

जगात सिरीयल किलिरच्या अनेक घटना आपण पाहिल्या, वाचल्या आहेत. भारतात देखील असे अनेक खतरनाक सिरीयल किलर होऊन गेले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये केवळ पुरुषच नाही तर अनेक महिलांचा देखील समावेश आहे. पंजाबमधील अशीच एक महिला जिला भारताची ब्लॅक विडो म्हणतात, तिने सहा वर्षात 17 लग्न केली आणि सर्वच्या सर्व 17 पतींची हत्या केली होती.

Crime News
IFFI: हृदयस्पर्शी 'धाबरी कुरुवी'; फक्त स्थानिक कलाकार असलेला भारतीय इतिहासातील पहिला चित्रपट

पंजाबमधील भटिंडा येथे राहणार्‍या लाला वान यांचे वयाच्या 14 व्या वर्षी पहिले लग्न झाले होते. जेव्हा ती नववधू म्हणून सासरी आली पण, काही दिवसांतच ती विधवा होईल असे कुणालाही वाटले नव्हते. लाला वान आपल्या पतीसोबत एकट्या राहत होत्या. लग्नानंतर तीन-चार महिने सगळं ठीक होतं. दोघेही खुश होते. अचानक लाला पतीपासून दूर जाऊ लागली. सहा महिन्यातच लालाच्या पतीचा मृत्यू झाला.

दरम्यान, लालाने वयाच्या 14 व्या वर्षी पहिल्या पतीला विष देऊन त्याचा खून केला होता. पहिल्या पतीच्या मृत्यूनंतर लालाच्या आयुष्यात दुसरा व्यक्ती आला, त्यामुळे तिने पहिल्या पतीच्या जेवणात विष मिक्स करून त्याला दिले व त्याचा खून केला. दरम्यान, लालाने दुसरे लग्न करून ती दुसऱ्या गावात शिफ्ट झाली. काही दिवस पतीबरोबर राहिल्यानंतर लालाने दुसऱ्या पतीला देखील ठार मारले. असे एक - दोन नव्हे तर तब्बल 17 जणांचा बळी घेतला.

Crime News
PM Modi In Telangana: "मी रोज 2-3 किलो शिव्या खातो पण.." पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर घाव

सुरूवातीला अशा घटना घडल्यानंतर महिलेच्या कुंडलीत काही दोष असल्याची शंका व्यक्त केली जात होती. एक घटना घडल्यानंतर लगेच दुसरे लग्न करण्यास लाला तयार असायची, दरम्यान एका मागून एक घटना खूनाची घटना समोर येत होती. वीस वर्षात लालाने 16 वेळा लग्न केले. 17 वे लग्न केल्यानंतर पोलिसांना या महिलेवर संशय आला. पोलिसांना सतराव्या पतीला वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र लालाने पतीला विष देऊन मारले होते. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सखोल चौकशीनंतर अखेर तिने सर्व खूनांची कबुली दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com