भारतीय विद्यार्थी युक्रेन सैन्यात सामील; रशिया विरुद्ध उचलणार शस्त्र

सैनिकेश रविचंद्रन 2018 मध्ये अभ्यासानिमित्त युक्रेनला गेला होता.
Sainikesh
Sainikesh Dainik Gomantak

तामिळनाडूतील कोयम्बतूर येथील 21 वर्षीय सैनिकेश रविचंद्रन आता रशियाविरुद्ध युद्धात शस्त्र उचलणार आहे. तो युक्रेनच्या सैन्यात सामील झाला आहे. सैनिकेशच्या आई-वडिलांनाही याबाबत माहिती दिली.

Sainikesh
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एमपी वृत्तपत्राच्या मालकाला जन्मठेपेची शिक्षा

सैनिकेश रविचंद्रन 2018 मध्ये अभ्यासानिमित्त युक्रेनला गेला होता. तो खार्किव येथील नॅशनल एरोस्पेस विद्यापीठात (University) शिकत होता. त्याचा कोर्स जुलै 2022 मध्ये पूर्ण होणार होता, मात्र त्याआधीच रशियाने युक्रेनवर आक्रमण केले.

Sainikesh
युक्रेनमध्ये 4 गोळ्या लागलेला हरज्योत सिंग मायदेशात दाखल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाने (Russia) युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर सैनिकेशचा त्याच्या घराशी संपर्क पूर्णपणे तुटला. सैनिकेशशी संपर्क न झाल्याने त्याच्या पालकांनी युक्रेनमधील (Ukraine) भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. दूतावासाच्या अधिकाऱ्यांना त्याची चौकशी केल्यावर माहिती समोर आली की त्याने रशिया विरुद्धच्या युद्धात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तो युक्रेनच्या सैन्याचा भाग झाला आहे.

यादरम्यान सैनिकेशच्या आई-वडिलांनी सांगितले की, त्याला आधीच सैन्यात भरती व्हायचे होते. त्याने भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी अर्जही केला होता, पण तो अर्ज फेटाळण्यात आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com