युक्रेनमध्ये 4 गोळ्या लागलेला हरज्योत सिंग मायदेशात दाखल

युक्रेनची राजधानी कीव येथे गोळ्या लागल्याने जखमी झालेला भारतीय नागरिक हरजोत सिंग हा भारतीय वायुसेनेच्या विमानातून दिल्लीत दाखल झाला आहे.
Harjyot Singh
Harjyot SinghDainik Gomantak

युक्रेनची (Ukraine) राजधानी कीव (Kyiv) येथे गोळ्या लागल्याने जखमी झालेला भारतीय नागरिक हरजोत सिंग (Harjot Singh) हा भारतीय वायुसेनेच्या विमानातून दिल्लीत (Delhi) दाखल झाला आहे. (Harjyot Singh who was shot 4 times in Ukraine returned home)

Harjyot Singh
World Women's Day: महिलांच्या सन्मानात पोस्ट खात्याकडून टपाल तिकिटे

त्याला उपचारासाठी दिल्लीतील लष्कराच्या आरआर रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असे केंद्रीय मंत्री जनरल (Retired) व्हीके सिंग यांनी ट्विट करुन सांगितले आहे.

तो पोलंडमध्ये दाखल झाला होता, त्यानंतर त्याला भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) विशेष विमानात नेण्यात आले, जे त्याला आणि इतर भारतीयांना पोलंडमधून भारतात परत आणणार आहे.

Harjyot Singh
विशेष विमान, युक्रेनमधून 200 भारतीयांसह दिल्लीत दाखल

पोलंडहून परतल्यानंतर जनरल व्ही के सिंग यांनी हरजोत सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याचे जाहीर केले आहे. याआधीही सोमवारी सकाळी जनरल सिंग यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता, "आयएएफ सी-17 मधील प्रवाशांपैकी एक आज हरजोत सिंग असणार आहे.

मी देशाला खात्री देतो की तो चांगल्या हातात आहे. त्याला त्याच्या कुटुंबासोबत पुन्हा भेटायला पाहण्यास मी उत्सुक आहे. आशा आहे की तो लवकरात लवकर बरा होईल, असे व्हीके सिंग यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com