Indian Railway Recruitment:1664 पदांसाठी करा असा अर्ज

2021च्या नवीन भरतीसाठी उत्तर मध्य रेल्वेने प्रशिक्षणार्थींच्या नवीन भरतीसाठी अर्ज मागवले आहेत(Indian Railway Recruitment)
Indian Railway Recruitment: Apply for 1664 posts
Indian Railway Recruitment: Apply for 1664 postsDainik Gomantak
Published on
Updated on

रेल्वे(Indian Railways) विभागात मोठी भरती निघाली आहे. 2021च्या नवीन भरतीसाठी उत्तर मध्य रेल्वेने प्रशिक्षणार्थींच्या नवीन भरतीसाठी अर्ज मागवले आहेत(Indian Railway Recruitment). ज्यामध्ये जवळपास 1664 पदांची नेमणूक केली जाणार असल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे(Job Openings).या भरतीसाठी जे पात्र उमेदवार आहेत ते उमेदवार RRC NCR ची अधिकृत वेबसाइट rrcpryj.org द्वारे आपले ऑनलाईन अर्ज भरू शकतात(Government Jobs). ही अर्ज भरण्याची प्रक्रिया २ ऑगस्टला सुरू होणार असून तर 1 सप्टेंबर 2021 पर्यंत ती सुरू राहणार आहे. म्हणजेच आपला अर्ज भरायची शेवटची तारीख 1सप्टेंबर 2021 असणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Indian Railway Recruitment: Apply for 1664 posts)

Indian Railway Recruitment: Apply for 1664 posts
आयकर आणि महाराष्ट्र दूरसंचार विभागात नोकऱ्यांची संधी

अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड 2020-21 या सालासाठी उत्तर मध्य रेल्वेच्या अधिकार क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागात प्रशिक्षणार्थीं म्हणून केली जाणारा आहे. ज्यासाठी उमेदवारांना परीक्षेसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.किंवा 10+2 परीक्षा पद्धतीत दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.याचबरोबर ट्रेड वेल्डर, वायरमन आणि सुतार यांच्यासाठी मान्यताप्राप्त शाळेतून 8 वी पास किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.तसेच या पदांसाठी NCVT / SCVT द्वारे अधिसुचित केलेल्या ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवां ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

या पदांसाठीची वयोमर्यादही ठरवण्यात आली असून ती वयोमर्यादा 15 वर्षे ते 24 वर्षे असावी लागणार आहे. या अर्जासाठी लागणारी फि 100 असणार आहे मात्र SC,ST,PWD,आणि महिला अर्जदारांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com