Online Payment Fraud: ऑनलाइन फसवणूक झाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर माहिती

विविध प्रकारे होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना आपण रोज पाहत असतो, वाचत असतो.
Online Fraud
Online Fraud Dainik Gomantak
Published on
Updated on

डिजिटलायझेशनमुळे प्रत्येक गोष्ट फक्त एका क्लिकच्या अंतरावर आहे. यामुळे ऑनलाइन पेमेंट करण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. ऑनलाइन पेमेंटच्या सुविधेमुळे, फसवणुकीच्या घटना देखील वाढल्या आहेत. विविध प्रकारे होणाऱ्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना आपण रोज पाहत असतो, वाचत असतो. तुमची फसवणूक झाल्यास काय कराल? कुठे तक्रार कराल? कुणाकडे मदत मिळेल? याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

Online Fraud
Online Payment: तुमचं ऑनलाईन पेमेंट सेफ आहे का?

फसवणुकीची तक्रार कुठे करायची?

केंद्रीय गृह मंत्रालयाने सायबर क्राइम किंवा ऑनलाइन फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक (155260) जारी केला आहे. या क्रमांकावर तुम्ही फसवणुकीची तक्रार नोंदवू शकता. तुम्ही कोणत्याही अशा प्रकारच्या गुन्ह्याचे बळी असाल तर सर्वप्रथम या क्रमांकावर कॉल करा. याशिवाय, तुम्ही गृह मंत्रालयाच्या https://cybercrime.gov.in/ या सायबर पोर्टलवरही याबाबत तक्रार करू शकता.

Online Fraud
QR Code Payment Risk : क्यूआर कोडवरून पेमेंट करत असाल तर थांबा! अन्यथा सहन करावे लागेल मोठे नुकसान

ऑनलाइन फसवणुकीची तक्रार करताच, सायबर टीम सक्रिय होते. टीम सर्वप्रथम संबंधित बँकेशी संपर्क साधते आणि तुमच्या खात्यातून ज्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले गेले आहेत तो व्यवहार थांबवून ठेवते. यामुळे ती व्यक्ती ते पैसे वापरू शकत नाही. तसेच, इतर कोणत्याही खात्यात ट्रान्सफर करू शकणार नाही.

ऑनलाइन फसवणुकीची घटना घडते तेव्हा सुरुवातीचे दोन-तीन तास खूप महत्त्वाचे असतात. अशा परिस्थितीत तुम्ही जितक्या लवकर तक्रार कराल तितक्या लवकर सायबर टीम कारवाई करेल. यामुळे तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यताही अधिक असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com