Browser Security Alert: तुमचा डेटा धोक्यात? भारत सरकारचा Chrome आणि Mozilla युजर्सना हाय अलर्ट, हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'हे' काम लगेच करा

Indian government high alert for Chrome Firefox users: भारतीय सायबरसुरक्षा एजन्सी इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने देशभरातील इंटरनेट वापरकर्त्यांसाठी उच्च-जोखीम अलर्ट जारी केला आहे.
Browser Security Alert
Browser Security AlertDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय सायबरसुरक्षा एजन्सी इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने देशभरातील इंटरनेट वापरकर्त्यांसाठी हाय अलर्ट अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट Google Chrome आणि Mozilla Firefox या दोन लोकप्रिय वेब ब्राउझर वापरणाऱ्यांसाठी आहे. CERT-In ने इशारा दिला आहे की, या ब्राउझरच्या जुन्या व्हर्जनमध्ये अनेक धोकादायक असुरक्षा आढळल्या आहेत, ज्याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात.

CERT-In च्या अहवालानुसार, Chrome आणि Firefox च्या जुन्या आवृत्त्यांमध्ये अशा असुरक्षा आहेत ज्या हॅकर्सना वापरकर्त्याच्या सिस्टममध्ये घुसखोरी करण्याची परवानगी देऊ शकतात.

यामुळे हॅकर्स वापरकर्त्यांचा डेटा चोरी करू शकतात, डिव्हाइस रिमोटली नियंत्रित करू शकतात, खाजगी डेटामध्ये हॅकर्स सहज प्रवेश करू शकतो.

Browser Security Alert
Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

Google Chrome मध्ये सध्या आढळलेल्या गंभीर बग्समध्ये Use After Free, Integer Overflow, Heap Buffer Overflow यांचा समावेश आहे. हॅकर्स हे बग्स ब्राउझर क्रॅश करु शकतात किंवा दुर्भावनापूर्ण वेबसाइटवर क्लिक केल्यास संगणकावर कोड स्वयंचलितपणे रन होऊ शकतो.

Mozilla Firefox मध्ये आढळलेले गंभीर बग्स - cookie Storage Isolation, JavaScript JIT Error, Graphics Overflow यांचा समावेश आहे. या त्रुटींमुळे वापरकर्त्यांचे ब्राउझिंग डेटा आणि पासवर्ड चोरीला जाऊ शकतात.

सर्वात जास्त धोका कोणाला आहे?

CERT-In नुसार, हा धोका केवळ वैयक्तिक वापरकर्त्यांपुरता मर्यादित नाही. सरकारी विभाग, खाजगी कंपन्या आणि बँकांचे नेटवर्क देखील धोक्यात आहेत. जर नेटवर्कवर जुने ब्राउझर चालू असतील, तर हॅकर्स संपूर्ण सिस्टममध्ये प्रवेश मिळवू शकतात आणि संवेदनशील माहिती चोरू शकतात. सरकारने Chrome आणि Firefox वापरकर्त्यांना ताबडतोब ब्राउझर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

Google Chrome वापरकर्ते

आवृत्ती 137.0.7151.119 (Windows/Linux) किंवा 137.0.7151.120 (MacOS) पेक्षा जुनी असल्यास ताबडतोब अपडेट करा. यासाठी ब्राउझरमध्ये जाईन “Help → About Google Chrome” Updateवर क्लिक करा.

Mozilla Firefox वापरकर्ते

नवीनतम व्हर्जनमध्ये सुरक्षा पॅच उपलब्ध आहे. ब्राउझरमध्ये जाऊन Menu → Help → About Firefox → Install Updateवर क्लिक करा. यामुले तुमचं ब्राउझरचं व्हर्जन अपडेट होईल.

Browser Security Alert
Goa Politics: "हे 33 नरकासुर गोवा जाळतील", श्रीकृष्ण विजयोत्सवात विरोधी पक्षांची वज्रमुठ; सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान?

अपडेट करणे का महत्त्वाचे आहे?

ब्राउझर अपडेट्स केवळ नवीन वैशिष्ट्ये देत नाहीत तर असलेल्या असुरक्षा दुरुस्त करतात. जर वापरकर्ता अपडेट करण्यात अयशस्वी झाला, तर त्यांची सिस्टम हॅकर्ससाठी सोपे लक्ष्य बनते. अलीकडील काही महिन्यांत फिशिंग आणि रॅन्समवेअर हल्ले वाढले आहेत, त्यामुळे इंटरनेट वापरताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.

संशयास्पद वेबसाइट किंवा लिंकवर क्लिक करू नका. अज्ञात ईमेल किंवा संदेशातील लिंक तपासा. वापरत नसलेले एक्सटेंशन किंवा अ‍ॅड-ऑन काढा. अँटीव्हायरस आणि फायरवॉल नेहमी सक्रिय ठेवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com