Indian Flag In Uk: खलिस्तान समर्थकांना भारतीयांचे चोख प्रत्युत्तर ; लंडनमधील भारतीय दूतावासावर फडकला मोठा तिरंगा, Video Viral

खलिस्तान समर्थकांनी तिरंगा खाली उतरवल्यानंतर त्यांना चांगलेच चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Indian Flag In Uk
Indian Flag In UkDainik Gomantak

Indian Flag In Uk: भारतीय उच्चायुक्तात खलिस्तानींच्या उपद्रवानंतर भारताने आता चोख प्रत्युत्तर दिले आहे. रविवारी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातून खलिस्तानवाद्यांनी भारतीय तिरंगा खाली उतरवला.

पण आता पूर्वीपेक्षा मोठा तिरंगा फडकावून खलिस्तानी समर्थकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.  याआधी रविवारी अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आले होते.

या व्हिडिओमध्ये भारताचा तिरंगा फडकतांना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, लंडनमधील खलिस्तान समर्थकांच्या एका गटाने रविवारी म्हणजेच 19 मार्चला भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने करत फुटीरतावादी नेता अमृतपाल यांचे झेंडे आणि पोस्टरसह घोषणाबाजी केली. 

अमृतपाल सिंगच्या फोटोसह पोस्टरमध्ये लिहिले होते की, फ्री अमृतपाल सिंग, आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही अमृतपाल सिंग यांच्यासोबत उभे आहोत. भारतीय उच्चायुक्ताबाहेर निदर्शने करत असताना खलिस्तान समर्थकांनी गोंधळ घातला आणि ते हतबल झाले. 

यावेळी त्यांनी भारतविरोधी घोषणाही दिल्या. व्हायरल व्हिडिओमध्ये एक खलिस्तानी भारताचा ध्वज उतरवताना दिसत आहे. खलिस्तानी समर्थकांचे निदर्शन रोखण्यासाठी पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com