भारतीय सैन्य (Indian Army) जॉईन करू इच्छिणाऱ्यांसाठी आता मोठी संधी चालून अली आहे . कारण भारतीय सैन्यात खूप मोठी भरती निघाली आहे (Indian Army Recruitment). जर तुम्ही इंजिनीअरिंगचे (Engineers) शिक्षण घेतले असेल तर तुम्हाला भारतीय लष्करात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. भारतीय लष्कराने तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी (Technical Graduate Course) भरती प्रक्रिया सुरू केली असून जे उमेदवार अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेतून B.Tech किंवा BE करत आहेत ते विद्यार्थी य पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. आणि विशेष म्हणजे या पदासाठी केंद्र सरकारच्या ७ व्या वेतनआयोगानुसार (7th Pay Commission) उत्तम वेतनाचा लाभ मिळणार आहे.(Indian Army recruitment Opening for engineers)
भारतीय सैन्याची ही134 वी TGC एंट्री असून या पदांसाठी जानेवारी 2022 मध्ये प्रशिक्षण सुरू होणार असून यातून एकूण 40 पदांची भरती होणार आहे. विशेष म्हणजे यावर निवड होणाऱ्या पदवीधारकांना घसघशीत वेतन मिळणार असून सुरवातीला हे वेतन 56,100 रुपये असेल तर पुढे हे वेतन 1.77 लाखापर्यंत वाढणार आहे.
या पदासाठी पात्रता काय लागणार
या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इंजिनीअरिंगच्या कोणत्याही शाखेतून B.Tech किंवा BE पदवीचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.त्याचबरोबर जे विद्यार्थी अंतिम वर्षाचे शिक्ण घेत आहेत ते देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराचे वय 20 ते 27 वर्ष असणे आवश्यक आहे . ही सगळी आणि यासोबतच अधिक माहिती एक वेबसाइटवरतीहि देण्यात अली आहे.
अर्ज कसा करावा
या पदासाठी joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइट वरून अर्ज करता येणार आहे.ही अर्ज प्रक्रिया यापूर्वीच 17 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर2021आहे. अर्ज भरणे विनामूल्य असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.