Army Cheetah Helicopter Crash: लडाखमध्ये लष्कराचे 'चीता' हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी

Ladakh Helicopter Accident Shyok River: लडाखच्या दुर्गम भागातून भारतीय लष्कराच्या सुरक्षेशी संबंधित एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली.
Ladakh Helicopter Accident Shyok River
Army Cheetah Helicopter CrashDainik Gomantak
Published on
Updated on

Army Cheetah Helicopter Crash: लडाखच्या दुर्गम भागातून भारतीय लष्कराच्या सुरक्षेशी संबंधित एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली. लडाखमधील श्योक नदीच्या जवळ असलेल्या भागात भारतीय लष्कराचे एक 'चीता' हेलिकॉप्टर अचानक कोसळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उड्डाणादरम्यान हे हेलिकॉप्टर थेट एका डोंगराला जाऊन धडकले आणि त्याचा भीषण अपघात झाला. या मोठ्या दुर्घटनेतून लडाखमध्ये तैनात असलेले लष्कराचे एक डिव्हिजन कमांडर सुदैवाने पूर्णपणे सुरक्षित राहिले. मात्र, हे हेलिकॉप्टर उडवणाऱ्या दोन्ही पायलटला या अपघातात गंभीर दुखापत झाली.

ही धक्कादायक घटना 20 मे रोजी दिवसाच्या वेळी घडली. हेलिकॉप्टर डोंगराला धडकल्याची माहिती मिळताच भारतीय लष्कराने तातडीने सूत्रे हलवली आणि अवघ्या 15 ते 20 मिनिटांच्या आत घटनास्थळी आपत्कालीन मदत आणि बचाव पथक रवाना केले. ढिगाऱ्याखालून मेजर जनरल आणि दोन्ही पायलट यांना सुरक्षित बाहेर काढून तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने लेह येथे आणण्यात आले. सध्या जखमी वैमानिकांवर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Ladakh Helicopter Accident Shyok River
Iran Helicopter Crash: इराणमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर अणुकेंद्राजवळ कोसळलं! पायलटसह 4 जणांचा जागीच मृत्यू VIDEO

लष्करी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी हा अपघात (Accident) झाला, त्यावेळी लडाखमधील हवामान पूर्णपणे स्वच्छ होते आणि दृश्यमानतेची कोणतीही समस्या नव्हती. त्यामुळे हवामान चांगले असतानाही हेलिकॉप्टर थेट डोंगराला कसे धडकले, याचे गूढ वाढले असून लष्कराने अपघाताच्या खऱ्या कारणांचा शोध घेण्यासाठी 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश दिले.

Ladakh Helicopter Accident Shyok River
US Army Helicopter Crash: कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकन लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, 5 नौसैनिकांचा मृत्यू

या अपघातामुळे भारतीय लष्कराच्या (Indian Army) ताफ्यातील जुन्या होत चाललेल्या 'चीता' हेलिकॉप्टर्सच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. चीता हे एक सिंगल इंजिन असणारे हेलिकॉप्टर असून, अत्यंत उंचावरील आणि दुर्गम भागात लष्करी मोहिमांसाठी त्याचा वापर केला जातो. सध्या आर्मी एव्हिएशनकडे सुमारे 190 चीता, चेतक आणि चीतल हेलिकॉप्टर्सचा ताफा आहे. मात्र, यातील तब्बल 5 हेलिकॉप्टर्स ही 50 वर्षांपेक्षाही जास्त जुनी आहेत, तर अंदाजे 130 हेलिकॉप्टर्स 30 ते 50 वर्षे जुनी झाली आहेत. हे हेलिकॉप्टर्स आता कालबाह्य होत असल्याने ते तातडीने बदलण्यात यावेत, अशी मागणी संरक्षण तज्ज्ञांकडून बऱ्याच काळापासून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर झालेला हा अपघात लष्कराची चिंता वाढवणारा ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com