Israel Spike Missile: भारतीय वायुसेनेची वाढणार ताकद, जाणून घ्या 'स्पाईक' मिसाईल चे खास वैशिष्ट्य

इस्रायलने तयार केलेली स्पाईक-NLOS मिसाईल भारतीय वायुसेनेत दाखल होत असून आता भारताची ताकद वाढणार आहे.
Israel Spike Missile:
Israel Spike Missile:Dainik Gomantak

India receives Spike NLOS missiles from Israel: इस्रायलने तयार केलेली स्पाईक-NLOS मिसाईल भारतीय वायुसेनेत दाखल होत असून आता भारताची ताकद वाढणार आहे. वायुसेनेच्या हेलिकॉप्टरने ही मिसाईल असणार आहे. उंचावर असणारे शत्रूचे टँक आणि इतर वाहनांना नाश करण्यासाठी या मिसाईलचा वापर करण्यात येणार आहे. या मिसाईलला चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात करण्यात येणार आहे.

भारतीय सैन्याकडे आधीच एक स्पाईक मिसाईल आहे. पण ही मिसाईल सैनिक आपल्या खांद्यावरुन लाँच करत होते. आता या मिसाईलचे एअर-फोर्स व्हर्जन भारताकडे आले आहे. यामुळे हेलिकॉप्टरवरुन हे क्षेपणास्त्र लाँच करता येणार आहे.

Israel Spike Missile:
Ahmedabad: मग काय भूताने दिली NEET परीक्षा? गुजरातमधील विचित्र घटना, एक विद्यार्थी अडचणीत
  • या मिसाईलचे वैशिष्ट्य

ही मिसाईल आकाराने अगदी छोटी आहे. पण याच्या मदतीने एक संपूर्ण टँक उद्धवस्त होऊ शकतो.

ही मिसाईल खांद्यावर ठेऊन किंवा ट्रायपॉड-बायपॉड अशा स्टँडवर ठेऊनही डागली जाऊ शकते.

हेलिकॉप्टर, टँक अशा वाहनांमध्येही ही मिसाईल घेऊन जाऊ शकतो.

ही मिसाइल शत्रुचे टेंशन वाढवणार आहे. कारण एकदा या मिसाइलने टार्गेट फिक्स केले की कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरीही ही त्याचा नाश होतो. यामुळे शत्रूची वाहने ना पळू शकतात, ना लपू शकतात. केवळ टँकच नाही, तर शत्रूच्या हेलिकॉप्टरचा वेध देखील घेण्याची क्षमताही आहे. इस्राईलसोबतच जगातील 35 देशांकडे ही मिसाईल आहे.

भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरमध्ये 600 ते 25 हजार मीटर रेंज असणारी स्पाईक मिसाईल बसवण्यात येणार आहे. या मिसाईलमध्ये इन्फ्रारेड सेन्सरही असतो. त्यामुळे अंधारातही शत्रूच्या वाहनांचा शोध घेण्याची क्षमता या मिसाइलमध्ये आहे.

2019 या वर्षाच्या सुरुवातीला चीन आणि पाकिस्तानसोबत सीमेवर वाद वाढला होता. यामुळे मोदी सरकारने आपत्कालीन स्थितीत इस्राईकडून 240 स्पाईक MR मिसाईल आणि 12 लाँचर्स मागवले होते. त्याच वर्षाच्या अखेरीस त्यांना सैन्याकडे सुपूर्द करण्यात आले. आता वायुसेनेलाही आणखी स्पाईक मिसाईल मिळाल्या आहेत.यामुळे भारतीय वायसेनेची ताकद वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com