Ahmedabad High Court: मग काय भूताने दिली NEET परीक्षा? गुजरातमधील विचित्र घटना, एक विद्यार्थी अडचणीत

विद्यार्थ्यांच्या स्कोअरकार्डमध्ये लिहिलेल्या क्रमांकावर कोणीही परीक्षेला बसल्याची नोंद उपलब्ध नाही.
NEET Exam Scam
NEET Exam ScamDainik Gomantak

Ahmedabad High Court: गुजरात हायकोर्टातून एक अजब प्रकरण समोर आले आहे. एमबीबीएसच्या जागेसाठी एका विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

प्रवेश समितीने तो विद्यार्थी घोस्ट उमेदवार असल्याचा दावा केला आहे.

विद्यार्थ्यांच्या स्कोअरकार्डमध्ये लिहिलेल्या क्रमांकावर कोणीही परीक्षेला बसल्याची नोंद उपलब्ध नाही. असे कारण प्रवेश समितीने दिले आहे.

अहमदाबादमधील या विद्यार्थ्याने यावर्षी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) UG दिली आणि मेडिकल सीटसाठी चांगल्या गुणांसह NEET परीक्षाही पास केली. असा दावा त्याने केला आहे

त्यानंतर जेव्हा ACPUGMEC मध्ये समुपदेशनासाठी अर्ज केला आणि कागदपत्र पडताळणीही केली.

दरम्यान, प्रवेश समिती अर्ज स्वीकारत नसल्याचे समोर आल्याने त्याला धक्काच बसल्याचे विद्यार्थ्याच्या वकिलाने न्यायालयात केलेल्या याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी उच्च न्यायालयाने या महिन्याच्या 22 तारखेला होणार आहे.

NEET Exam Scam
Dharmendra Shabana: रणवीर, आलिया नव्हे धर्मेंद्र आणि शबाना यांच्या लिपलॉक सीनची चर्चा अधिक, धर्मेंद्र यांचे भन्नाट उत्तर

काय आहे नक्की प्रकरण?

अहमदाबादमधील एका विद्यार्थ्‍याने यावर्षी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) मध्ये बसून चांगले गुण मिळवले. तो मेडिकल सीटसाठी पात्र ठरली.

त्याने प्रोफेशनल अंडरग्रेजुएट मेडिकल एज्युकेशनल कोर्सेस (ACPUGMEC) साठी प्रवेश समितीकडे अर्ज केला आणि समुपदेशनादरम्यान कागदपत्र पडताळणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली.

पण, त्याच्या उमेदवारीबद्दल, प्रवेश समितीने त्याच्याशी संपर्क साधला आणि दिलेल्या अर्ज क्रमांकाचा एकही विद्यार्थी NEET साठी बसला नसल्याने त्याचा अर्ज विचारात घेतला जाऊ शकत नाही.

असे समितीने सांगितले. त्याजागी घोस्ट विद्यार्थिनी होती आणि त्याचे स्कोअरकार्ड त्यांच्या रेकॉर्डमध्ये नव्हते. असेही समितीने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com