Bengaluru Assault Case: हवाई दलाचे विंग कमांडर अन् स्क्वॉड्रन लीडरवर बंगळुरुमध्ये हल्ला, आरोपी गजाआड; व्हिडिओ व्हायरल!

Indian Air Force Officers Attacked: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर आदित्य बोस आणि त्यांची पत्नी स्क्वॉड्रन लीडर मधुमिता यांच्यावर बंगळुरुमध्ये सार्वजनिक ठिकाणी हल्ला करण्यात आला.

Indian Air Force Officers Attacked
Bengaluru Assault CaseDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर आदित्य बोस आणि त्यांची पत्नी स्क्वॉड्रन लीडर मधुमिता यांच्यावर बंगळुरुमध्ये सार्वजनिक ठिकाणी हल्ला करण्यात आला. हे दोघेही डीआरडीओ कॉलनी सीव्ही रमण नगरकडून विमानतळाकडे जात होते. याचदरम्यान त्यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला. विंग कमांडर बोस यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन या संपूर्ण घटनेची माहिती दिली. विंग कमांडर बोस यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी एफआयआर दाखल केला

दरम्यान, बंगळुरुमधील (Bengaluru) हल्ल्याची ही घटना सोशल मीडियावर पोस्ट करणारे विंग कमांडर आदित्य बोस यांनी पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल केली नाही. तथापि, त्यांची पत्नी मधुमिता यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. मिळालेल्या माहितीनुसार, मधुमिता यांच्या तक्रारीवरुन बंगळुरु पोलिसांनी एफआयआर नोंदवला.


Indian Air Force Officers Attacked
Bengaluru Flyover: बंगळूरात HSR Layout उड्डाणपुल बंद; वाहतूक कोंडीमुळे प्रवासी संतप्त

विंग कमांडर म्हणाले...

विंग कमांडर बोस यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना 18 एप्रिल रोजी घडली. या दिवशी विंग कमांडर बोस आणि त्यांची पत्नी डीआरडीओ कॉलनी, सीव्ही रमण नगरकडून विमानतळाकडे जात होते. यादरम्यान, एका दुचाकीस्वाराने त्यांची गाडी थांबवली आणि त्याने कन्नड भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

बोस यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा दुचाकीस्वाराने त्यांच्या गाडीवर DRDO लिहिलेले पाहिले तेव्हा प्रकरण आणखी बिकट झाले. त्याने पहिल्यांदा माझ्या पत्नीवर अपमानास्पद टिप्पणी केली. हे ऐकून जेव्हा मी गाडीतून बाहेर आलो तेव्हा त्याने माझ्यावर हल्ला केला. एवढेच नाहीतर घटनास्थळी उपस्थित लोकही हल्लेखोराच्या बाजूने माझ्यावर हल्ला करण्यासाठी धावले. त्यांच्यापैकी एकाने माझ्या दिशेने दगड भिरकावला. यादरम्यान मी या हल्ल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये माझा चेहरा पूर्ण रक्ताने माखलेला दिसत आहे.


Indian Air Force Officers Attacked
Bengaluru Crime: बंगळुरुतील फार्म हाऊसमध्ये सुरु होती ‘रेव्ह पार्टी’; CCB चा छापा, 5 जण गजाआड!

सशस्त्र दलातील व्यक्तीसोबत लोक असे कसे वागू शकतात

विंग कमांडर बोस यांनी व्हिडिओत पुढे सांगितले की, लोक सशस्त्र दलातील व्यक्तीसोबत असे कसे वागू शकतात? बोस यांनी त्यांच्यावरील हल्ल्याबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बंगळुरु पोलिसांनी घटनेची दखल घेत या प्रकरणी कारवाई केली. पोलिसांनी आरोपीला (Accused) ताब्यात घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com