India vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामना बरोबरीत सुटला तर काय होणार? वाचा आयसीसीचे नियम

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे.
India vs Pakistan
India vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात सुरु आहे. या महामुकाबल्याची नाणेफेक झाली आहे. यात पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. जर पाकिस्तान संघ सामना गमावला तर उपांत्य फेरीत पोहोचणे कठीण होऊ शकते. दुसरीकडे, भारतीय संघ या विजयासह उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के करू शकतो.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना बरोबरीत सुटला तर पुढे काय होईल, याबाबत जाणून घेऊया.जर भारत आणि पाकिस्तानमधील सामना अनिर्णित राहिला तर सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे ठरवला जाईल.

India vs Pakistan
Goa Accident: करसवाडा हायवेवर अपघाती सत्र!! दुचाकीची ट्रकला धडक; हेल्मेटमुळे स्थानिक थोडक्यात बचावला

आयसीसीने बनवलेल्या नियमांनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कोणताही सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल. जर एका सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला नाही, तर आणखी एक सुपर ओव्हर होईल आणि निकाल येईपर्यंत सुपर ओव्हर्सचा क्रम अशाच प्रकारे चालू राहील.

स्पर्धेतील बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. जर पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे सामना खेळवता आला नाही, तर सामना राखीव दिवशी खेळवला जाईल.

India vs Pakistan
ISL 2024-25: FC Goa चा दणदणीत विजय! केरळा ब्लास्टर्सवर 2-0 ने मात; 42 गुणांसह दुसरे स्थान अबाधित

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव

पाकिस्तानचा संघ

इमाम-उल-हक, बाबर आझम, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सौद शकील, सलमान आघा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, अबरार अहमद, हरिस रौफ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com