Mayem: ‘त्या’ शेतजमिनींबाबत आशा पल्लवीत! मये स्थलांतरित मालमत्ता प्रश्न; मालकी हक्कासाठी 130 अर्ज

Mayem land ownership rights: सनद मिळण्यापासून वंचित असलेल्या १५ ऑगस्ट २०१४ पूर्वीच्या मयेतील घरांसह आता शेतजमिनींचा मालकी हक्क मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
Mayem Land News
Mayem Land NewsDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: सनद मिळण्यापासून वंचित असलेल्या १५ ऑगस्ट २०१४ पूर्वीच्या मयेतील घरांसह आता शेतजमिनींचा मालकी हक्क मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

दरम्यान, सरकारने केलेल्या खास तरतुदीनुसार अर्ज सादर करण्याची मुदत संपण्यास जेमतेम बारा दिवस असून, आतापर्यंत १३० जणांनी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज सादर केले आहेत, अशी खात्रिलायक माहिती डिचोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयातून उपलब्ध झाली आहे. १३० पैकी १०५ अर्ज सर्व्हे करण्यासाठी मामलेदार कार्यालयात पाठविण्यात आल्याची माहितीही मिळाली आहे.

मयेतील स्थलांतरित मालमत्तासंदर्भात दुरुस्ती कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी म्हणजेच १५ ऑगस्ट २०१४ पूर्वी ज्यांनी घरे बांधली आहेत आणि मालकी हक्कापासून वंचित राहिलेल्या घरमालकांना हक्क मिळवण्यासाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत गेल्या १० जुलैपासून घर आणि जमीनींचा हक्क मिळण्यासाठी वंचित मयेवासीयांकडून आवश्यक कागदपत्रासह उपजिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात येत असून, ही प्रक्रिया ७ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. आवश्यक माहितीअभावी किंवा नजरचुकीने म्हणा घर आणि जमिनीसंदर्भात हक्क मिळवण्यापासून मयेतील काहीजण वंचित असल्याचे निदर्शनास आल्यानेच सरकारकडून ही खास तरतूद करण्यात आली आहे.

सुधारित कायद्यानुसार स्थलांतरित मालमत्तेंर्गत २०१६ ते २०२१ या कालावधीपर्यंत दिलेल्या मुदतीत घरांचा मालकी हक्क मिळवण्यासाठी मयेतील ८५३ जणांनी अर्ज सादर केले होते. त्यातील ७५३ अर्ज निकालात काढून त्यांना सनद देण्यात आली आहे. तर जमिनीसंदर्भात ४९७ अर्ज आले असून, यापैकी बहुतेक अर्जधारकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com