'अफगाणिस्तानची भूमी दहशतवादासाठी वापरता येणार नाही';भारत रशियाचा एक सूर

रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार Nikolai Patrushev यांनी त्यांच्या भारत दौऱ्यावर अजित डोभाल (Ajit Doval) यांच्यासोबत बैठक घेत चर्चा केली आहे. (Afghanistan)
India, Russia warn against terror groups functioning from Afghanistan
India, Russia warn against terror groups functioning from AfghanistanDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) राजवटीनंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भारत लक्ष ठेवून आहे. भारत वेगवेगळ्या देशांशी चर्चा करत आहे, या भागात भारताची रशियासोबत (Russia) चर्चा झाली आहे. रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार Nikolai Patrushev यांनी त्यांच्या भारत दौऱ्यावर अजित डोभाल (Ajit Doval) यांच्यासोबत बैठक घेत चर्चा केली आहे . भारत आणि रशिया या दोन्ही देशांनी असा इशारा दिला आहे की, अफगाणिस्तानची जमीन दहशतवादी संघटना वापरू शकतात.(India, Russia warn against terror groups functioning from Afghanistan)

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, रशियन एनएसए निकोलाई पेट्रुशेव यांनी अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली आहे. भारत आणि रशियाचा असा विश्वास आहे की अफगाणिस्तानातून कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटना आसपासच्या परिसराला धोका निर्माण करू शकतात.

तालिबानने जगाला दिलेली आश्वासने पूर्ण केली पाहिजेत यावर दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. हा मानवी हक्कांचा, महिलांच्या हक्कांचा मुद्दा असावा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतर कोणत्याही देशाच्या दहशतवादी संघटनांना त्याची जमीन वापरता येणार नाही असेही ठामपणे या दोन्ही देशांनी खडसावले आहे. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार,अफगाणिस्तानमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना कार्यरत आहेत, ज्या भारतासह आसपासच्या परिसरासाठी धोकादायक आहेत. भारताची भीती आहे की पाकिस्तानची दहशतवादी संघटना अफगाणिस्तानची भूमी वापरू शकतील , अशा परिस्थितीत तालिबानसोबत पाकिस्तानच्या आयएसआयचे संबंध देखील चिंतेचा विषय आहे.

India, Russia warn against terror groups functioning from Afghanistan
BRICS Summit: मोदींच्या अध्यक्षतेखाली पाच देशांची बैठक, अफगाणिस्तानवर होणार चर्चा

आता भारत आणि रशिया अंमली पदार्थांची तस्करी, स्थलांतर आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर एकत्र काम करतील. भारत-रशिया बऱ्याच काळापासून सामरिक दृष्टिकोनातून खूप जवळ आले आहेत, अशा परिस्थितीत जेव्हा अमेरिका येथून निघून गेली आहे, तेव्हा अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर दोन्ही देशांची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनते.

भारताने यापूर्वी अनेक वेळा इशारा दिला आहे की, अफगाणिस्तानची माती दहशतवादी संघटनांनी वापरू नये. अफगाणिस्तानमध्ये आधीच पाकिस्तानच्या अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत, ज्यात लष्कर आणि जैश सारख्या नावांचा समावेश आहे. आता हक्कानी नेटवर्क तालिबान सरकारचा भाग बनला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com