Gastric Cancer: चिंता वाढली! तरुणांमध्ये वाढतोय पोटाच्या कर्करोगाचा धोका, प्रभावित देशांत भारताचा येतो 2 रा नंबर; रिपोर्टमधून खुलासा

Cancer Risk In India 2025 Report: अलिकडेच प्रकाशित झालेल्या एका वैद्यकीय अहवालाने अनेक देशांना धक्का दिला आहे.
Cancer risk in India 2025 report
Gastric CancerDainik Gomantak
Published on
Updated on

Gastric Cancer In Youth: अलिकडेच प्रकाशित झालेल्या एका वैद्यकीय अहवालाने अनेक देशांना धक्का दिला आहे. या संशोधनानुसार, 2008 ते 2017 दरम्यान जन्मलेल्या सुमारे 1.5 कोटी (15 दशलक्ष) तरुणांना भविष्यात पोटाच्या कर्करोगाचा धोका आहे. चिंताजनक बाब म्हणजे या अहवालात या धोक्याने सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये चीननंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. याचा अर्थ असा की, येत्या काळात भारतातील लाखो तरुणांना गंभीर आरोग्य संकटाचा सामना करावा लागू शकतो.

जगभरातील 1.56 कोटी लोकांना पोटाच्या कर्करोगाचा धोका असल्याचे संशोधकांनी नोंदवले आहे. यापैकी 76 टक्के प्रकरणे हेलिकोबॅक्टर पायलोरी (एक प्रकारचा जीवाणू) मुळे होऊ शकतात. आतापर्यंत पोटाचा कर्करोग हा वृद्ध लोकांचा आजार मानला जात होता, परंतु या नवीन अहवालातून हे स्पष्ट झाले आहे की, या आजाराच्या विळख्यात तरुणही अडकत आहेत. मात्र चांगली गोष्ट म्हणजे वेळेवर चाचणी आणि उपचार केल्यास धोका टळू शकतो.

Cancer risk in India 2025 report
Lungs Cancer: वारंवार खोकला अन् श्वास घेण्यास त्रास होत असेल सावधान! असू शकते फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण? जाणून घ्या काय सांगतायेत तज्ञ

हेलिकोबॅक्टर पायलोरी (एच. पायलोरी) नावाचा जीवाणू काय आहे?

तरुणांमध्ये पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढण्याची मुख्य कारणे बदलती जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, प्रदूषित अन्न, पाणी आणि हेलिकोबॅक्टर पायलोरी (एच. पायलोरी) नावाच्या जीवाणूंचा संसर्ग मानली जातात. हा जीवाणू मुख्यतः घाणेरड्या पाण्यामुळे पसरतो. दूषित पाणी पिण्यामुळे पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. भारतासारख्या देशांमध्ये जिथे लोकसंख्या खूप मोठी आहे आणि आरोग्य जागरुकता मर्यादित आहे, तिथे हा धोका आणखी वाढतो.

पोटाच्या कर्करोगाच्या वाढीमागे अनेक कारणे

भारतात (India) पोटाच्या कर्करोगाच्या वाढीमागे अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अस्वास्थ्यकर आहार - ज्यामध्ये जास्त मीठ, मसालेदार अन्न, प्रक्रिया केलेले अन्न आणि पॅकेज केलेले अन्न समाविष्ट आहे. याशिवाय, दूषित पाणी पिणे, सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव, पोषणाचा अभाव आणि बॅक्टेरियाचा संसर्ग यामुळे पोटाच्या आतील आवरणाला नुकसान होऊन कर्करोगासारखी गंभीर लक्षणे देखील उद्भवू शकतात.

Cancer risk in India 2025 report
Blood Cancer: ब्लड कॅन्सर होण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात? कोणत्या लोकांना जास्त धोका असतो? वेळीच सावध व्हा!

पोटाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे

गॅस्ट्रिक कर्करोगाची (Cancer) सुरुवातीची लक्षणे सहसा दुर्लक्षित केली जातात कारण ती किरकोळ गॅस, अपचन किंवा पोटदुखीसारखी दिसतात. परंतु प्रत्यक्षात ही गंभीर लक्षणे असू शकतात. जलद वजन कमी होणे, वारंवार उलट्या होणे, अशक्तपणा, थकवा आणि मलमधून रक्त येणे ही या आजाराची लक्षणे असू शकतात. जर ही लक्षणे वेळेवर तपासली गेली नाहीत तर हा कर्करोग हळूहळू शरीरात पसरु शकतो आणि उपचार करणे कठीण होऊ शकते.

Cancer risk in India 2025 report
Oral Cancer: सावधान! तोंडातील अल्सर ठरु शकतात कर्करोगाचे कारण, जाणून घ्या तज्ञांचे मत अन् प्रतिबंधात्मक उपाय

प्रतिबंधात्मक उपाय

हा धोका टाळण्यासाठी आजपासूनच आपण जागरुकता वाढवणे महत्वाचे आहे. सर्वप्रथम, आहारात सुधारणा केली पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, फळे खाणे, पुरेसे पाणी पिणे आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळणे खूप महत्वाचे आहे. तसेच, हेलिकोबॅक्टर पायलोरीचा संसर्ग टाळण्यासाठी स्वच्छ पाणी पिणे आणि स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. जर पोटात जळजळ किंवा वेदना वारंवार होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका आणि डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com