पुरी जरा थांबा! 'तेलाचा भडका' मंत्री म्हणाले '...भारतात पेट्रोलचे दर पाच टक्यांनी वाढले'

देशातील पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या किमती गेल्या 15 दिवसांत 13 वेळा वाढल्या आहेत.
Union Minister Hardeep Singh Puri
Union Minister Hardeep Singh PuriDainik Gomantak

देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेल्या 15 दिवसांत 13 वेळा वाढल्या आहेत. पेट्रोल 9.20 रुपयांनी महागलं आहे. परंतु या वाढत्या महागाईवर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Union Minister Hardeep Singh Puri) यांचे एक अजबच वक्तव्य समोर आले आहे. पुरी यांनी मंगळवारी लोकसभेत सांगितले की, ''रशिया-युक्रेन युद्धानंतर भारतात (India) पेट्रोलच्या किमतीत केवळ 5 टक्के वाढ झाली आहे, तर विकसित देशांमध्ये त्याचीच किंमत 50 टक्क्यांनी वाढली आहे. राज्यसभेत युक्रेनमधील (Ukraine) परिस्थितीवर झालेल्या चर्चेदरम्यान मध्यस्थी करताना पुरी यांनी ही माहिती दिली.''

केंद्रीय मंत्री म्हणाले की, ''भारतात एकूण किंमतीपैकी फक्त 5 टक्के वाढ झाली आहे, तर अमेरिकेत 51 टक्के वाढ झाली आहे. कॅनडामध्ये 52 टक्के, जर्मनी आणि ब्रिटनमध्ये 55 टक्के, फ्रान्समध्ये 50 टक्के, स्पेनमध्ये 58 टक्के इंधनासाठी वाढ झाली आहे.''

Union Minister Hardeep Singh Puri
Edible oil Price: केंद्र सरकारच्या निर्णयामुळे तेलाच्या किमतींचा भडका

दरम्यान, इतर विकसनशील आणि विकसित देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोल आणि डिझेलची किंमत खूपच कमी आहे. ऑपरेशन गंगा हे युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी केवळ एक मिशन ट्रान्सपोर्ट असल्याचा विरोधकांचा आरोपही पुरी यांनी निराधार असल्याचे म्हटले आहे. पुरी हे युक्रेनमधील भारतीयांना परत आणण्याच्या मोहिमेशी संबंधित विशेष दूतांपैकी एक होते, ज्यांची नियुक्ती युद्धग्रस्त भारतीयांना आणण्यासाठी करण्यात आली होती. ते पुढे म्हणाले की, 'भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत मायदेशात आणण्यासाठी युध्दपातळी काम केले. याला निव्वळ ऑपरेशन ट्रान्सपोर्ट म्हणता येणार नाही.'

पेट्रोलच्या वाढत्या किमतींबाबत केंद्रीय मंत्री म्हणाले की, युक्रेन-रशिया युद्धाचा फटका भारत हा एकमेव देश नाही, संपूर्ण जगाला याचा फटका बसला आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमतीही अनेक पटींनी वाढल्य आहेत.

Union Minister Hardeep Singh Puri
Edible Oil: येत्या दिवसांत खाद्य तेल होणार स्वस्त

दुसरीकडे, युक्रेनवर रशियाची लष्करी कारवाई सुरु होण्यापूर्वी भारताने विद्यार्थ्यांना दिलेला सल्ला स्पष्ट नव्हता, असा आरोपही मंत्र्यांनी फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, ''सल्ला खूपच स्पष्ट होता आणि भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन सोडण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळेच सुमारे चार हजार भारतीय विद्यार्थांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.''

पुरींचा दावा - या देशांमध्ये किमती वाढल्या

  • अमेरिका - 51%

  • कॅनडा - 52%

  • जर्मनी - 55%

  • यूके - 55%

  • फ्रान्स - 5०%

  • स्पेन-58%

  • भारत- 05%

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com