Edible oil Price: केंद्र सरकारच्या निर्णयामुळे तेलाच्या किमतींचा भडका

सर्वसामान्य जनतेच महागाईने आधीच कंबरडं मोडलं त्यात रोजच्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारने खाद्यतेलाच्या किमती रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत.
Edible oil
Edible oil Dainik Gomantak
Published on
Updated on

सर्वसामान्य जनतेच महागाईने आधीच कंबरडं मोडलं त्यात रोजच्या वाढत्या महागाईच्या (Inflation) पार्श्वभूमीवर सरकारने खाद्यतेलाच्या किमती रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. आता सरकारने पाळत (Surprise Inspections) ठेवण्याची मोहीम सुरू केल्याचे समोर येत आहे. खाद्यतेलाच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी आणि त्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी तेल-तेलबियांची साठवणूक आणि काळाबाजार थांबवणे हा त्यांचा उद्देश असल्याचे म्हटले जात आहे. (Edible oil price Due to the decision of the central government oil prices will go up again)

Edible oil
वीजेशिवाय चालतात हे एसी, दर महिन्याला होते 4 हजारांची बचत

देशात खाद्यतेलाची 60 टक्के गरज भागवण्यासाठी आयात करण्यात येते. रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) निर्माण झालेल्या जागतिक राजकीय अस्थिरतेमुळे गेल्या काही महिन्यांत विविध खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत झपाट्याने वाढ होते आहे. सरकारने विविध उपाययोजना राबवूनही दरात सातत्याने वाढ होत आहे.

अन्न पुरवठा विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी सांगितले की, सरकारने किमती रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. खाद्यतेल आणि तेलबियांची साठवणूक आणि काळाबाजार रोखण्यासाठी 1 एप्रिलपासून तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. याअंतर्गत राज्य सरकारच्या (State Government) अधिकाऱ्यांसह केंद्रीय पथक विविध तेलबिया आणि खाद्यतेल उत्पादक राज्यांमध्ये तपासणी करत आहे.

Edible oil
Alert: पॅन कार्डचा गैरवापर होत असल्यास घ्यावी 'अशी' काळजी

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये तपासणी सुरू असल्याचे पांडे यांनी सांगितले आहे. येत्या काही दिवसांत पाळत मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. इतर उपायांबद्दल त्यांनी सांगितले की सरकारने आधीच खाद्यतेलांवरील आयात शुल्क कमी केले आहेत त्याबरोबरच साठा मर्यादा वाढवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त किरकोळ विक्रेते निर्धारित कमाल किरकोळ किंमत (MRP) चे पालन करतात याची खात्री करण्यासाठी वारंवार बैठका सुरू झाल्या आहेत.

तीन महिन्यांत दरात मोठी वाढ

सूर्यफूल तेलाबद्दल सुधांशू पांडेय म्हणाले की रशिया आणि युक्रेन हे दोन प्रमुख तेल पुरवठादार देश आहेत. खासगी व्यावसायिक इतर देशांतून खाद्यतेल खरेदी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, त्याचे प्रमाण खूपच कमी असणार आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या तीन महिन्यांत सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल आणि पाम तेलाच्या सरासरी किरकोळ किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Edible oil
'त्या' गुंतवणुकदारांची झाली दिवाळी; TATA ग्रुपच्या कंपनीचे शेअर्स वधारले

खाद्यतेलाच्या किमतींत किती वाढ?

4 एप्रिल रोजी सूर्यफूल तेलाची सरासरी किरकोळ किंमत प्रति किलो 184.58 रुपये आहे जी 1 जानेवारी 2022 रोजी 161.71 रुपये प्रति किलो एवढी होती. सोयाबीन तेल 148.59 रुपयांवरून 162.13 रुपये किलो एवढे झाले आहे. पामतेल प्रतिकिलो 128.28 रुपयांवरून 151.59 रुपये किलो एवढे झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com