India Global Forum: इंडिया ग्लोबल फोरम भारत-ब्रिटन यांच्यातील धोरणात्मक संबधांवर टाकणार प्रकाश!

India Britain Relations: सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. लोकसभा निवडणुकीतील सहा टप्प्यातील मतदान आतापर्यंत पार पडले आहे.
dr jaishankar
dr jaishankar Dainik Gomantak

India Britain Relations: सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. लोकसभा निवडणुकीतील सहा टप्प्यातील मतदान आतापर्यंत पार पडले आहे. याच पार्श्वभूमीवर, इंडिया ग्लोबल फोरमचा 6 वा वार्षिकी कार्यक्रम लंडनमध्ये आयोजित होत आहे. ज्यामध्ये भारत आणि ब्रिटन यांच्यातील धोरणात्मक संबंधावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. दोन्ही देशातील व्यापारी धोरणाबरोबर राजनैतिक संबंधाचा उहापोह या सहाव्या वार्षिकी कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमासाठी दोन्ही देशातील वरिष्ठ मंत्री, प्रसिद्ध उद्योजक, विचारवंत आणि गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत. यामध्ये दोन्ही देशातील नवनिर्वाचित सरकारांच्या द्विपक्षीय संबंधाच्या भविष्यावरील देखील चर्चा होणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांनंतर लगेचच आणि 4 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अगदी आधी हा कार्यक्रम (24 ते 28 जून) होत असल्याने याला अधिक महत्व आहे. ‘’निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या सरकारसमोर नव्या संधींबरोबर नवी आव्हानेही उभे ठाकतात. म्हणूनच IGF लंडन 2024 हा कार्यक्रम विशेष अर्थाने महत्त्वाचा आहे. दोन्ही देशात हे फोरम एक महत्त्वाचे केंद्र म्हणून काम करते. दोन्ही देशासाठी हे फोरम आर्थिक आणि भू-राजकीय स्टॉकटेक म्हणून काम करते. याशिवाय कोणत्याही नवीन सरकारसाठी धोरणात्मक दिशा सूचित करते,”असे इंडिया ग्लोबल फोरमचे संस्थापक आणि अध्यक्ष मनोज लाडवा यांनी नमूद केले.

dr jaishankar
India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

दुसरीकडे, भारत हा वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताकडे अवघ्या जगाची सध्या नजर आहे. भारत येत्या काळात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल अशी भाकिते वर्तवली जात आहेत. ‘’ज्याप्रमाणे जग भारताकडे पाहत आहे आणि त्याउलट, IGF लंडन दोन्ही देशांचा दृष्टीकोन आणि धोरणे तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. हा फोरम केवळ सध्याच्या भू-राजकीय वातावरणाचेच विश्लेषण करत नाही तर भविष्यातील सहयोग आणि नवकल्पनांसाठी आवश्यक दिशानिर्देश देखील देतो. भविष्यासाठी अजेंडा सेट करण्याची ही खरोखरच अभूतपूर्व संधी आहे,” असेही ते पुढे म्हणाले.

तसेच, IGF लंडन भारतीय निवडणूक निकालांचा सखोल अभ्यास करेल. त्याचबरोबर जागतिक भू-राजकारण आणि व्यापार या दोन्हींवरील परिणामांची अंतर्दृष्टी दोन्ही देशांना प्रदान करेल. शिवाय, भविष्यातील भारत-ब्रिटन संबंधांचे मूल्यमापन आणि मार्गदर्शन करण्यासाठी हा फोरम महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून काम करेल. दीर्घकाळ विलंबित भारत-ब्रिटन मुक्त व्यापार कराराला अंतिम रुप देणे आणि 2030 रोडमॅपच्या प्रगतीचा आढावा घेणे यासह ब्रिटन सरकारसमोर येणाऱ्या तातडीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीही हा फोरम काम करेल.

dr jaishankar
India Canada Relations: जस्टिन ट्रुडोचे पुन्हा बरळले, आम्ही खलिस्तानसोबत आहोत; भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?

दरम्यान, जगाच्या नजरेतून पाहिल्यास IGF लंडन सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात आवश्यक असलेला जागतिक संवाद आणि सहयोगासाठी एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करते. 2000 हून अधिक स्पीकर्ससह लंडन आणि विंडसरमधील प्रतिष्ठित ठिकाणी 15 कार्यक्रमांसह, IGF लंडन 2024 मध्ये विविध विषयांवर विचारनमंथन करेल. विचारवंत, नेते, धोरणकर्ते, बिझनेस टायकून आणि सांस्कृतिक राजदूत आपले विचार या व्यासपीठावर जगासमोर मांडतात.

इंडिया ग्लोबल फोरम बद्दल

इंडिया ग्लोबल फोरम समकालीन भारताची कहाणी सांगतो. बदलाचा आणि विकासाचा वेग भारताने निश्चित केला आहे. सध्या अवघे जग भारताकडे एक संधी म्हणून पाहत आहे. इंडिया ग्लोबल फोरम व्यासपीठ मोठ्या जागतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून एक अंर्तदृष्टी प्रदान करते. आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट्स आणि धोरणकर्त्यांना त्यांच्या क्षेत्रातील आणि भौगोलिक क्षेत्रातील प्रमुख भागधारकांशी संवाद साधण्याची अतुलनीय संधी हे व्यासपीठ प्रदान करते. विशेषत:हा जागतिक नेते, बहुपक्षीय संस्था, नव निर्वाचित सरकारे, उद्योग तज्ञ, गुंतवणूकदार यांच्यासाठी नवी दिशा ठरवण्यासाठी हे फोरम एक प्रमुख व्यासपीठ आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com