देशात लवकरच 6G येणार?

6G चा इंटरनेट स्पीड (Internet Speed) 5G पेक्षा 50 पट वेगवान असेल.
India get 6G technology soon? Learn Internet Speed and Features
India get 6G technology soon? Learn Internet Speed and Features Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतातील दूरसंचार कंपन्या सध्या 5 Gच्या चाचण्या करत आहेत. पुढल्या वर्षी भारतात 5G सेवा सुरू होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान 5G सेवेच्या व्यावसायिक रोलआऊटपूर्वीच 6Gच्या येणार अशा बातम्या चर्चेत आल्या आहेत. भारतात 6G ची तयारीही सुरू झाल्याचे सांगितले जाते. असे सांगण्यात येत आहे की 6G चा इंटरनेट स्पीड (Internet Speed) 5G पेक्षा 50 पट वेगवान असेल. काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की सरकारने 6G नेटवर्कची (Network) तयारी सुरू केली आहे, असे म्हंटले जात जाते की दूरसंचार विभागाने राज्य संचालित दूरसंचार संशोधन कंपनी C-DOT ला जबाबदारी सोपावली आहे. सरकारने सी- डॉटला 6G नेटवर्कशी संबंधित सर्व तांत्रिक शक्यताचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टेलीकॉमचे सचिव के. राजारामन यांनी म्हटले आहे की 6G शी संबंधित तांत्रिक शक्यतांचा विचार केला पाहिजे. 6G जगभरातील बाजारात तसेच भारतामध्ये यावेळी लॉच होऊ शकेल. भारताची सध्या 5G चाचणी सुरू आहे, तर 2019 मध्ये दक्षिण कोरिया, चीन आणि अमेरिकेच्या बाजारात 5G नेटवर्क सुरू करण्यात आले आहे. टेलीकॉमचे सचिव के. राजारामन यांनी म्हटले आहे की 6G शी संबंधित तांत्रिक शक्यतांचा विचार केला पाहिजे. 6G जगभरातील बाजारात तसेच भारतामध्ये यावेळी लॉच होऊ शकेल. भारताची सध्या 5G चाचणी सुरू आहे, तर 2019 मध्ये दक्षिण कोरिया, चीन आणि अमेरिकेच्या बाजारात 5G नेटवर्क सुरू करण्यात आले आहे. असे अनेक मोठे देश आहेत जे सध्या 6G नेटवर्कवर काम करता आहेत. यामध्ये सॅमसंग, एलजी, हुआवेईसारख्या मोठ्या कपन्यांचे नावे आहेत. ज्यांनी 6G नेटवर्कवर काम सुरू केले आहे. असा अंदाज आहे की 6G नेटवर्क 2028-2030 पर्यंत जागतिक स्तरावर देखील आणले जाऊ शकेल. म्हणूनच भारतानेही 6G नेटवर्कची तयारी सुरू केली आहे.

India get 6G technology soon? Learn Internet Speed and Features
मैत्रिणीला गोवा फिरवण्याच्या नादात दोन मित्रांची फजिती

* 5G नेटवर्क स्पीड

5G नेटवर्क 20Gbps पर्यंत जास्तीत जास्त डेटा डाउनलोड स्पीड देऊ शकते. त्याच वेळी, भारतातील 5G नेटवर्कची चाचणी दरम्यान, डेटा डाउनलोडची कमाल गती 3.7 Gbps पर्यंत पोहोचली आहे. Airtel, Vi आणि Jio नेटवर्क 3 Gbps पर्यंत डेटा डाउनलोड स्पीड टेस्ट केली आहे.

* 6G नेटवर्कची स्पीड

अशी अपेक्षा आहे की 6G नेटवर्कमध्ये 1000 Gbps एवढ्या स्पीडपर्यंत पोहोचू शकेल. एलजीने 6G ट्रेल्स देखील सुरू केल्याचे एका अहवालावरून समोर आले आहे. 6G ची चाचणी करतांना 100 मीटर अंतरावर डेटा पाठविला गेला आणि प्राप्त केला. ही चाचणी देखील यशस्वी मनाली गेली. 6Gनेटवर्क मध्ये, तुम्ही 6GB मुव्ही फक्त 51 सेकंदात 1000 मेगाबाइट प्रती सेकंद वेगाने डाउनलोड करू शकता.

* 6G जी नेटवर्कची वैशिष्ट्ये

6G नेटवर्क 5G पेक्षा 15 पट अधिक वेगवान असेल.

जपानमधील 6Gनेटवर्क 2030 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

जपान व्यतिरिक्त दक्षिण कोरिया, चीन आणि फिनलँड देखील 6G नेटवर्कची तयारी करत आहेत.

भारतातही आता 6G नेटवर्कची तयारी सुरू केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com