मैत्रिणीला गोवा फिरवण्याच्या नादात दोन मित्रांची फजिती

जिवाचा गोवा करायला निघालेल्या दिल्लीच्या या दोन मित्रांचा प्लॅन पोलिसांनी फेल केला.
Police arrested two auto lifters carrying girlfriend to Goa
Police arrested two auto lifters carrying girlfriend to Goa Dainik Gomanatak

मैत्रिणींसाठी वाट्टेल ते करायला तयार असणाऱ्या दिल्लीच्या या दोन तरूणांनी तर कहरच केला. मात्र जिवाचा गोवा (Goa) करायला जाण्याऱ्या या दोन मित्रांचा प्लॅन पोलिसांनी फेल केला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या (Delhi) द्वारका पोलिसांनी (Police) अशा दोन ऑटो लिफ्टर (Auto lifter) अटक केली की, त्यांनी त्यांच्या मैत्रिणींना फिरवण्यासाठी दोन बाइक चोरल्या. अटक केलेल्या आरोपींकडून चार चोरीच्या स्कूटी आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 9500 रुपये रोख, चोरीला गेलेला मोबाईल फोनही जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना दिल्लीच्या महावीर एन्क्लेव्ह, दीपक उर्फ ​​नोनी दादा देव हॉस्पिटल त्याच्या एका सहकाऱ्यासह डाबरीजवळील छठ पूजा पार्कमध्ये येणार आहे. अशी माहिती मिलालली होती. आणि पोलिसांनी या दुचाकी चोरांना पकडण्यासाठी सापळा रचला. दीपकचा स्नॅचिंग, दुचाकी चोरीमध्ये सहभाग असल्याची माहितीही पोलिसांकडे होती. आणि अगदी फिल्मी स्टाइल पद्दतीने पोलिसांनी या चोरांना दिल्लीत अटक केली.

Police arrested two auto lifters carrying girlfriend to Goa
मुलांना कोरोनाविरोधी लस देणारे तामिळनाडू पहिले राज्य असेल: आरोग्यमंत्री सुब्रमण्यम

माहितीच्या आधारे पोलिसांनी हा सापळा छठ पूजा पार्कमध्ये रचला होता. दीपक उर्फ ​​नोनी छठ पूजा पार्कवर पोहोचताच आधीच तयार असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. दीपकसोबत दिल्ली पोलिसांनी करण नावाच्या व्यक्तीला अटकही केली आहे. चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितले की त्यांना त्यांच्या मैत्रिणीला गोव्याला घेऊन जायचे होते म्हणून त्यांनी या दुचाकी चोरी केल्या होत्या.

Police arrested two auto lifters carrying girlfriend to Goa
येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ; पीएवर छापा अन् 750 कोटींची मालमत्ता जप्त

दिल्ली पोलिसांच्या चौकशी केली असता आरोपींनी सांगितले की, ते त्यांच्या मैत्रिणींना गोव्याला घेऊन जाण्यासाठी ऑटो लिफ्टर बनले होते. गोव्याला जावून फिरणे हा एवढ्याश्या हेतूसाठी दीपक उर्फ ​​नोनी आणि करण या दोन मित्रांना चोर बनाव लागल. पोलिसांनी यांच्याकडून चोरीची स्कूटी आणि दुचाकी जप्त केली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डबरी पोलीस स्टेशन परिसरातून चोरलेली स्कूटी या दोघांच्या सांगण्यावरून जप्त करण्यात आली आहे. दीपकचे वय 19 आणि करणचे वय 25 वर्षे असल्याचे सांगितले आहे. आणि इतक्या कमी वयात या दोन तरूणांनी गोवा फिरायला जाण्याच्या खटाटोपात मैत्रिणीसाठी चोर बनाव लागल ही आश्चर्याची गोष्ट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com