''...कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार''; चीनसोबतच्या तणावादरम्यान लष्करप्रमुख स्पष्टच बोलले

Army Chief General Manoj Pandey: लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोमवारी सांगितले की, भारतीय लष्कर देशाच्या उत्तर सीमेवर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे.
Army Chief General Manoj Pandey
Army Chief General Manoj PandeyDainik Gomantak
Published on
Updated on

India-China Tension: पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) परिस्थिती अजूनही जैसे थे आहे. दरम्यान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोमवारी सांगितले की, भारतीय लष्कर देशाच्या उत्तर सीमेवर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे. ते पुढे म्हणाले की, 'जम्मू-काश्मीरच्या राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये अलीकडच्या काळात दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. उत्तरेकडील सीमेवर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आणि सक्षम आहे. या क्षेत्रात आमची क्षमता वाढवण्यासाठी आम्ही अनेक ठोस पावले उचलली आहेत.'

दरम्यान, मे 2020 पासून भारत आणि चीनमध्ये लष्करी संघर्ष सुरु आहे. या संघर्षावर चर्चेतून तोडगा काढण्याचेही प्रयत्न सुरु आहेत, मात्र अद्याप यश आलेले नाही. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत लष्करी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. गलवान व्हॅली, पँगॉन्ग त्सो, गोगरा (PP-17A) आणि हॉट स्प्रिंग्स (PP-15) या वादग्रस्त भागावर तोडगा काढण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या, असे असतानाही लडाखमध्ये भारत आणि चिनी सैन्याचे हजारो सैनिक शस्त्रास्त्रांसह तैनात आहेत.

Army Chief General Manoj Pandey
India-China Relations: नेहरु की पटेल, चीनबाबत मोदी सरकार कोणाच्या मार्गावर आहे? जयशंकर स्पष्टच बोलले

राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये आणखी सैनिक पाठवले

दरम्यान, संवेदनशील भागात वाढती दहशत पाहता भारतीय लष्कराने राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये आणखी सैन्य पाठवले आहे. तसेच, त्यांनी तिथे सक्रिय असलेल्या त्यांच्या युनिट्सची पुनर्रचना केली आहे. दुसरीकडे, दहशतवादविरोधी कारवाया प्रभावीपणे करण्यासाठी गुप्तचर नेटवर्कही मजबूत केले जात आहे. 21 डिसेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाल्यानंतर खोऱ्यातील दहशतवाद पुन्हा चर्चेत आला. गेल्या वर्षी काश्मीर खोऱ्यात दहशतवादविरोधी कारवाईत 7 जवान शहीद झाले होते, तर राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये 20 जवान शहीद झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com