Illegal Madrasas In UP: उत्तर प्रदेशात 7500 मदरसे अवैध

योगी सरकारच्या सर्व्हेक्षणातील माहिती; मुरादाबाद सर्वाधिक 585 अवैध मदरसे
Madrasa
MadrasaDainik Gomantak
Published on
Updated on

Illegal Madarasas In UP: उत्तर प्रदेशातील योगी सरकारने राज्यातील अवैध मदरशांची यादी बनवली आहे. एक महिना पाच दिवसांच्या सर्व्हेक्षणातून हा डाटा तयार केला गेला असून त्यानुसार राज्यात 7500 अवैध मदरसे असल्याचे समोर आले आहे. या मदरशांना मान्यताच नाहीय. दरम्यान, राज्यात 7442 वैध मदरसे असून यातून 19 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Madrasa
Bilkis Bano Case: दोषींच्या माफीला आव्हान देणाऱ्या नव्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट घेणार सुनावणी

असे सर्वाधिक 585 अवैध मदरसे मुरादाबाद येथे आहेत तर बस्ती येथे 350 आणि मुजफ्फरनगर येथे 240 मदरसे अवैध आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे मान्यता नसलेले 100 मदरसे आहेत. म्हणजेच लखनौपेक्षा पाचपट जास्त अवैध मदरसे मुरादाबाद येथे आहेत. तर तीनपट जास्त मदरसे बस्ती येथे आहेत. याशिवाय प्रयागराज येथील मऊ मध्ये 90, आझमगड येथे 95, कानपूर येथे 85 मदरसे अवैध आहेत.

युपी मदरसा बोर्डचे चेअरमन इफ्तिखार अहमद जावेद म्हणाले की, सर्व्हेक्षणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला जाईल. त्यानंतर हा अहवाल 15 नोव्हेंबर रोजी सरकारला सादर केला जाईल. त्यानंतर राज्य सरकार या अवैध मदरशांबाबत निर्णय घेईल.

Madrasa
Madras High Court: विवाह सोहळ्याशिवाय लग्न केल्यास लग्न नोंदणीला मान्यता नाही!

जावेद म्हणाले की, सरकारने शिक्षणाची गुणत्ता वाढविण्याच्या उद्देशाने हा सर्व्हे केला आहे. मदरशांना अवैध ठरवणे हा याचा उद्देश नाही तर शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे हा याचा उद्देश आहे. योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर 10 सप्टेंबर रोजी या सर्व्हेला सुरवात झाली होती.

अल्पसंख्याक कल्याण मंत्री धर्मपाल सिंह यांनी सांगितले की, अवैध मार्गाने फंडिंग मिळविणाऱ्या मदरशांवर कारवाई केली जाईल. अवैध मदरशांना वैध मानले जाऊ शकत नाही. अवैध मदरशांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय करता येईल, याचा विचार केला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com