चंदीगड: पंजाबचे (Punjab) मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी (Chief Minister Charanjit Singh Channy) यांच्या नेतृत्वाखालील पंजाबमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्तारला सुरूवात झाली आहे. ब्रह्म मोहिंद्रा (Brahma Mohindra) आणि मनप्रीत सिंग बादल (Manpreet Singh Badal) यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. तर सीएम चन्नी यांच्या नवीन मंत्रिमंडळातून माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी असलेल्या पाच मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्याता असल्याचे समोर येत आहे.
मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी शनिवारी दिल्लीतील पक्षाच्या हायकमांडशी नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात येणाऱ्या चेहऱ्यांबाबत अंतिम चर्चा केली. मंत्र्यांची अंतिम यादी तयार झाल्यानंतर मुख्यमंत्री चन्नी यांनी शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली, त्यानंतर शपथविधीची तारीख निश्चित करण्यात आली.
पंजाब सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या काही तासांपूर्वी, राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या एका विभागाने पक्षाचे प्रदेश प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांना पत्र लिहून 'कलंकित' माजी मंत्री राणा गुरजीत सिंह यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करू नये अशी मागणी केली आहे.
कॉंग्रेसचे आमदार ब्रह्म मोहिंद्रा आणि मनप्रीत सिंग बादल यांनी पंजाब सरकारच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ चंदीगडच्या राजभवनात घेतली. आमदार तृप्तसिंह बाजवा, अरुणा चौधरी, सुखबिंदर सरकारिया आणि राणा गुरजीत सिंह यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
सूत्रांच्या माहितीनुसार, परगट सिंग, राजकुमार वेरका, गुरकीरत सिंग कोटली, संगत सिंह गिलजियन, अमरिंदर सिंग राजा वडिंग, कुलजित नागरा आणि राणा गुरजीत सिंह यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्याता वर्तविण्यात येत होती.
अमरिंदर सिंग सरकारमधील मंत्री असलेले विजय इंदर सिंगला, मनप्रीत सिंग बादल, ब्रह्म मोहिंद्रा, सुखबीर सिंग सरकारिया, तृप्त राजिंदर सिंह बाजवा, अरुणू चौधरी, रझिया सुल्तान आणि भारत भूषण आशु यांना पक्षाने कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील पाच मंत्री राणा गुरमितसिंग सोधी, साधू सिंह धर्मसोत, बलबीर सिंह सिद्धू, गुरप्रीत सिंह कांगार आणि सुंदर शाम अरोरा यांना मंत्रिमंडळातून डिच्चू मिळाला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.