दिल्लीत 12 तासांत दुसऱ्यांदा CNG च्या दरात वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील वाढ झाली आहे.
CNG
CNG Dainik Gomantak
Published on
Updated on

दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. 12 तासांत दुसऱ्यांदा सीएनजीचे दर वाढले आहेत. दिल्लीत सोमवारी सकाळी सीएनजी 2.50 रुपयांनी महागला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील वाढ झाली आहे. (cng price increases two times in twelve hours)

CNG
13 वर्षीय मुलाने केली 8 वर्षाच्या मुलाची हत्या

दिल्लीत (Delhi) आज (सोमवारी) पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 103.81 रुपये प्रति लिटर आणि 95.07 रुपये प्रति लिटर (40 पैशांनी वाढ) आहे. त्याचवेळी सोमवारी सकाळी सीएनजीच्या दरात किलोमागे अडीच रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत एक किलो सीएनजीची किंमत 64.11 रुपये आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत. याआधी रविवारी रात्री उशिरा सीएनजीच्या (CNG) दरात 80 पैशांनी वाढ करण्यात आली होती.

CNG
UP: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आमदारांना शाळा दत्तक घेण्याच्या सूचना

पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 112 डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर 25 रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com