अमेरिकेत खलिस्तानवाद्यांनी बापूंच्या पुतळ्यावर लावला झेंडा !

महात्मा गांधींच्या पुतळ्यावर खलिस्तानी झेंडा लावून बापूंचा अपमान केला होता तर लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारतीय संविधानाची प्रत आणि ध्वज जाळला.
Ministry of External Affairs
Ministry of External Affairs Dainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे 26 जानेवारी रोजी खलिस्तानी समर्थकांनी भारतीय दूतावासासमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यावर खलिस्तानी झेंडा लावून बापूंचा अपमान केला होता. इतकेच नाही तर लंडनमध्ये (London) भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारतीय संविधानाची प्रत आणि ध्वजही जाळला. अमेरिका (America)आणि इंग्लंडशिवाय (england) कॅनडा व इटलीमध्येही खलिस्तानींनी निदर्शने केली. मात्र, खलिस्तान्यांनी केलेल्या या भ्याड कृत्यांवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे.

Ministry of External Affairs
व्ही अनंत नागेश्वर बनले भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार

संबंधित सरकारांकडे मुद्दा उचलला आहे: भारत

भारत सरकारने (Government of India)शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन या देशांच्या सरकारांना कारवाई करण्यास सांगितले आहे. अमेरिका आणि इटली यांच्यातील मिलानमधील खलिस्तानी निदर्शनांबाबत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताने हे मुद्दे इतर देशांसोबत उचलले आहेत. “अलीकडे काही अशी उदाहरणे घडली आहेत की, परदेशात कट्टरपंथी घटकांनी राजनैतिक परिसरात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर, वॉशिंग्टन डीसीमध्ये गांधी पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही संबंधित सरकारकडे (Government) हा मुद्दा उचलून धरला आहे आणि घडलेल्या घटनेसंदर्भात कारवाईची मागणी केली आहे."

महेश जेठमलानी यांना खलिस्तानींनी दिली धमकी

एक दिवस आधी खलिस्तानी दहशतवादी संघटना शीख फॉर जस्टिसने सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court ) वकिलाला धमकीचे फोन सुध्दा केले होते. ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांना SFJ कडून फोनवरून धमकी देण्यात आली असून SFJ संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नू यांनी सर्वोच्च न्यायालयात खलिस्तानी झेंडा फडकवणार असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, "जेठमलानी तुम्ही पाहाल की आम्ही या देशातील सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि तेथे झेंडा फडकवू."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com