जम्मू-काश्मीरमध्ये 14 दिवसात 12 दहशतवाद्यांना कंठस्नान

मागील काही दिवसात जम्मू काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराकडून मोठ्या कारवाया सुरू आहेत कारण जुलै महिन्याच्या 14 दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 12 दहशतवादी ठार झाले आहेत
In 14 days, 12 terrorists were killed in Jammu and Kashmir
In 14 days, 12 terrorists were killed in Jammu and KashmirTwitter @Ani

जम्मू-काश्मीरच्या(Jammu Kashmir) पुलवामा(Pulwama) येथे बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा(Terrorists) खात्मा केला आहे . यामध्ये पाकिस्तानी लष्करचा कमांडर एजाज उर्फ ​​अबू हुरैरा यांचा समावेश असून इतर दोन स्थानिक दहशतवादी आहेत. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.या तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. (Encounters)

या भागात काही दहशतवादी असल्याची छुपी माहिती भारतीय लष्कराला मिळाल्यानंतर लष्कराने या भागात शोध मोहीम सुरूकेली होती .आणि याच दरम्यान दहशतवाद्यांचा खात्मालष्कराने केला आहे. घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला.त्यालाच प्रत्युत्तरात देताना लष्करानेही क्रॉस फायरिंग केली आणि त्यात तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

मागील काही दिवसात जम्मू काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराकडून मोठ्या कारवाया सुरू आहेत कारण जुलै महिन्याच्या 14 दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 12 दहशतवादी ठार झाले आहेत. सर्व प्रथम, 2 जुलै रोजी पुलवामामध्येच सुरक्षा दलाच्या चकमकीत 5 दहशतवादी ठार झाले. यानंतर 8 जुलै रोजी राजौरीमध्ये 2 पाकिस्तानी दहशतवादी ठार झाले आहेत मात्र या कारवायांदरम्यान कनिष्ठ आयुक्त अधिकाऱ्यासह दोन सैनिकही शहीद झाले आहेत.

त्यानंतर 12 जुलै रोजी राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमधील दादालाच्या जंगलात सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

In 14 days, 12 terrorists were killed in Jammu and Kashmir
राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी नव्या मंत्र्यांची बैठक,अधिवेशनाची तयारी

पाकिस्तानच्या काहीना काही कुरापती अशात सुरूच आहेत कारण जुलै भारतीय लष्कराने अनेक ड्रोन हल्ले जम्मू काश्मीर भागात हाणून पडले आहेत. आणि हे ड्रोन सीमेपलीकडून आले असल्याची पुष्टीही करण्यात अली होती.अगदी कालही जम्मू-काश्मीरच्या अरनिया सेक्टरमध्ये मंगळवारी रात्री आकाशात लाल बत्ती असलेली वस्तू दिसली. सीमा सुरक्षा दलाने यावर गोळीबार केला तेव्हा ते पाकिस्तानमध्ये परतले. ते ड्रोन होते की इतर काही अद्याप याची खातरजमा झालेली नाही. दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या पुंछ भागात नियंत्रण रेषेवरील युद्धाच्या बातम्या आल्या आहेत. हे पाहता सीमेवर सैनिकांना सतर्क केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com