Implementation of Schems In Karnataka:
कर्नाटक मंत्रिमंडळाची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसने निवडणुकीदरम्यान दिलेल्या पाच आश्वासनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, या पाच आश्वासनांची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षापासून सुरू होणार आहे. असा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. ते म्हणाले की, मंत्रिमंडळाने जाती-धर्माचा भेदभाव न करता या 5 आश्वासनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, मी आणि पक्षाचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी आश्वासनांच्या हमीपत्रावर स्वाक्षरी केली आहे. काँग्रेस पक्षाने जनतेला दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करू. या आर्थिक वर्षातच सर्व आश्वासनांची अंमलबजावणी करू.
यासोबतच या योजनांचे लाभ सर्व लोकांपर्यंत पोहोचतील याचीही आम्ही काळजी घेऊ. यासाठी सरकारच्या योजनांची माहिती लोकांना व्हावी यासाठी आम्ही हमीपत्रांचे वाटप करणार आहोत.
1 जुलैपासून लोकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज योजनेचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या ग्राहकांनी १ जुलैपर्यंत बिल सादर केले नाही त्यांना ते सादर करावे लागणार आहे.
1 जुलैपासून दरमहा २०० युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार आहे.
युवानिधी योजनेअंतर्गत 2022-23 मध्ये उत्तीर्ण झालेल्या बेरोजगार पदवीधर तरुणांना दरमहा 3000 रुपये मिळणार आहेत. हे पैसे सरकार फक्त 2 वर्षांसाठी देणार आहे.
बेरोजगार डिप्लोमाधारकांना 24 महिन्यांसाठी दरमहा 1500 रुपये मिळतील.
1 जुलैपासून सर्व बीपीएल कुटुंबांना, अंत्योदय कार्डधारकांना अन्न भाग्य योजनेअंतर्गत 10 किलो धान्य मोफत मिळणार आहे.
15 ऑगस्टपासून गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील महिला प्रमुखास 2,000 रुपये मासिक मदत.
1 जूनपासून शक्ती योजनेंतर्गत कर्नाटकात महिलांना एसी लक्झरी बस आणि सार्वजनिक वाहतूक बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. काँग्रेसने 136 जागा जिंकून भाजप सरकारचा पाडाव केला. निकालानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकातील जनतेचे आभार मानत, आम्ही कर्नाटकच्या (Karnataka) जनतेला 5 आश्वासने दिली होती, ती लवकरच पूर्ण करु, असे आश्वासन दिले होते.
या निवडणुकीत कॉंग्रेसच्या स्थानिक नेतृत्त्वाने ही निवडणूक स्थानिक मुंद्यांभोवती ठेवली. त्यामुळे भाजपने गेल्या पाच वर्षांच्या काळात केलेल्या असंख्या चुकांमुळे मतदारांनी कॉंग्रेसला कौल दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.