Monsoon 2026: मान्सून हुलकावणी देणार? जुलैमध्येही पाऊस सरासरीपेक्षा कमीच; भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला अंदाज

IMD July Rainfall Forecast: ‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेतून जुलै महिन्याचा हवामान अंदाज जाहीर केला.
IMD July Rainfall Forecast
Monsoon 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

पुणे: जूनमध्ये झालेल्या अपुऱ्या पावसानंतर आता जुलैमध्येही देशात आणि राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे.

जुलैच्या सुरुवातीला मान्सून सक्रिय होण्याची शक्यता असली, तरी पुढे पावसातील संभाव्य खंडांमुळे या महिन्याचा पाऊस सरासरीखाली राहू शकतो, असे ‘आयएमडी’चे म्हणणे आहे. जूनमध्ये देशभरात महिन्याच्या सरासरीपेक्षा ३९.८ टक्के; तर राज्यात ५० टक्के कमी पाऊस झाल्याची आकडेवारी ‘आयएमडी’ने जाहीर केली.

IMD July Rainfall Forecast
Goa Yellow Alert: धुवांधार पाऊस अन् सोसाट्याचा वारा! गोव्यात पावसाची जोरदार बॅटिंग; पुढील 5 दिवस 'यलो अलर्ट'

‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी ऑनलाइन पत्रकार परिषदेतून जुलै महिन्याचा हवामान अंदाज जाहीर केला. जुलै हा मान्सून हंगामातील सर्वाधिक पावसाचा महिना असतो. सर्वसाधारणपणे हंगामातील एकूण पावसापैकी जूनमध्ये १९.१ टक्के, जुलैमध्ये ३२.३ टक्के, ऑगस्टमध्ये २९.४ टक्के, तर सप्टेंबरमध्ये १९.३ टक्के पाऊस होत असतो.

जुलै किंवा ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यास, त्याचा थेट परिणाम हंगामी पर्जन्यमानासोबत पिके आणि जलाशयांच्या पाणीसाठ्यावर होतो. डॉ. महापात्रा म्हणाले, ‘‘जुलैमध्ये देशात सरासरीच्या ९४ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे.

IMD July Rainfall Forecast
Goa Monsoon: ...अजूनही सुमारे 44 टक्‍क्‍यांची तूट! पुढील आठवड्याभरासाठी 'यलो अलर्ट' जारी

कोकण, घाटमाथा भागात जोरदार पावसाची शक्यता

कोकण, घाटमाथा परिसरात उद्या (ता.१) जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे. उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सावधानतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

बुधवारी कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, परिसरात विजांसह पावसाची शक्यता आहे. या काळात नागरिकांनी शक्यतो पाणथळ ठिकाणी वावरू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com