Covid Advisory: इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) या देशातील सर्वोच्च डॉक्टरांच्या संघटनेने जनतेला कोविड-संबंधित योग्य वर्तनाचे पालन करण्याचे आवाहन केले. IMA ने संभाव्य कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमांची यादी जारी केली आहे. सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालणे, योग्य शारीरिक अंतर राखणे, साबण, पाण्याने किंवा सॅनिटायझरने नियमितपणे हात धुणे या नियमांचे पालन करण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
काय म्हणाले IMA डॉक्टर?
लग्न समारंभ, राजकीय किंवा सामाजिक सभा आणि आंतरराष्ट्रीय प्रवास यासह सार्वजनिक ठिकाणी असलेल्या गर्दी टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. ताप, घसा खवखवणे, खोकला, हगवण यासारखी लक्षणे आढळल्यास त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच, कोरोनाचे दोन्ही डोस आणि अतिरिक्त खबरदारीचा डोससह लवकरात लवकर घ्यावा. असे आवाहन IMA च्या डॉक्टरांनी केले आहे.
काही देशांमध्ये कोविड रूग्णांची अचानक वाढ झाली आहे. त्यावरून इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) सर्वांना सतर्क केले आहे. जनतेला तात्काळ कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचे आवाहन देखील केले आहे. गेल्या 24 तासांत यूएस, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि ब्राझील या प्रमुख देशांमध्ये सुमारे 5.37 लाख नवीन कोरोना प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतात गेल्या 24 तासांत 145 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यापैकी चार प्रकरणे चीनमधील BF.7 या नवीन व्हेरिएंटची आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.