Cricket New Rule: क्रिकेटच्या तिन्ही प्रकारासाठी नवी नियमावली; डोक्याला दुखापत झाल्यास 7 दिवसांची विश्रांती अनिवार्य, काय आहेत नियम?

ICC New Rule: डोक्याला चेंडू लागल्यामुळे जखमी झालेल्या खेळाडूला किमान सात दिवस विश्रांतीचा कालावधी अनिवार्य करण्यात आला आहे.
Cricket New Rule
Cricket New RuleDainik Gomantak
Published on
Updated on

दुबई: क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांसाठी आयसीसीने शुक्रवारी नवी नियमावली जाहीर केली. त्यानुसार कन्कशन (डोक्याला चेंडू लागल्यामुळे जखमी) झालेल्या खेळाडूला किमान सात दिवस विश्रांतीचा कालावधी अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच वाइड चेंडू आणि सीमारेषेवरील झेलांच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत.

१७ ते २१ जून यादरम्यान गॉल येथे झालेल्या श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतून कसोटी क्रिकेटसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या नियमांच्या अंमलबजावणीस सुरुवात झाल्याचे आयसीसीने आपल्या संकेतस्थळावर स्पष्ट केलेले आहे.

आता एकदिवसीय तसेच टी-२० प्रकारातील नव्या नियमांची सुरुवात श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातच होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून होईल, असेही आयसीसीने म्हटले आहे. २ जुलैपासून एकदिवसीय आणि १० जुलैपासून टी-२० मालिका सुरू होत आहे.

Cricket New Rule
Goa Education: 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! गोव्यात एकाच टप्प्यात होणार परीक्षा

कन्कशन बदली खेळाडू कोण असतील हे प्रत्येक सामन्याअगोदर प्रत्येक संघाला जाहीर करावे लागणार आहे. त्यामुळे यजमान संघावर मर्यादा येणार आहेत. या अगोदर यजमान संघाला कन्कशन बदली खेळाडू निवडायला अनेक पर्याय असायचे. (मूळ संघ आणि राखीव असे अधिक पर्याय)

सात दिवसांची विश्रांती

एखादा खेळाडू कन्कशन झाला, तर सात दिवसांची विश्रांती त्याला घ्यावीच लागणार आहे. त्या खेळाडूची सुरक्षितता महत्त्वाची आहे, असे आयसीसीच्या वैद्यकीय समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे हा नवा नियम तयार करण्यात आला आहे, पण कधी कधी कन्कशनच्या नियमाचा वापर करून ‘जखमी’ झालेला एखादा खेळाडू लगेचच पुढच्या सामन्यात खेळण्यास सज्ज होत असतो, आता तसे करता येणार नाही.

वाइड चेंडूबाबत थोडा दिलासा

मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू असला की तो वाइड चेंडू ठरवला जायचा, आता त्यातून गोलंदाजांना थोडा दिलासा मिळणार आहे. याबाबत आयसीसीने प्रायोगिक तत्त्वावर दोन नवे नियम तयार केले आहेत. आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व असलेल्या देशांमधील सामन्यांसाठी हे नियम असतील. ऑक्टोबर २०२५ पासून पुढील सहा महिन्यांसाठी त्याची अंमलबजावणी होईल.

Cricket New Rule
Goa Rain: गोव्यात मान्सूनचा जोर वाढणार! IMD कडून पुढील 4 दिवस मध्यम पावसाचा अंदाज; यलो अलर्ट जारी

काय आहेत नियम

चेंडू टाकण्याच्या काही क्षण अगोदर फलंदाजाने स्टान्स (हालचाल केल्यास) बदलला आणि चेंडूचा टप्पा कोठे पडला यातील अंतरावरून वाइड चेंडू ठरवला जायचा. आता चेंडू टाकण्यापूर्वी फलंदाज जेथे उभा आहे, तेथूनच (भले त्याने स्टान्स बदलले असला तरी) चेंडूचा टप्पा कोठे पडला आहे, हे अंतर वाइड चेंडू ठरवताना लक्षात घेतले जाईल.

पॉपिंग क्रीजच्या पुढे गेलेला डाव्या यष्टीबाहेरचा चेंडू तयार करण्यात आलेल्या निदान रेषेच्या आत असेल, तर तो वाइड चेंडू ठरवला जायचा नाही. आता ही निदान रेषा थोडी पुढे नेली जाईल आणि त्याद्वारे पंच वाइड चेंडू ठरवतील.

वाइड चेंडूतून थोडा तरी दिलासा मिळावा म्हणून नियमांत काही तरी बदल केले जाऊ शकतील, असे आयसीसीच्या क्रिकेट समितीमध्ये असलेले दक्षिण आफ्रिकेचे माजी वेगवान गोलंदाज आणि कर्णधार यांनी जानेवारी महिन्यात सांगितले होते.

प्रथम श्रेणी देशांतर्गत सामन्यांसाठीही बदली खेळाडू घेण्याबाबत नवा नियम तयार करण्यात आला आहे. त्यानुसार अशा सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूला गंभीर दुखापत झाली (केवळ कन्कशनच नाही) तर त्याच्याऐवजी उर्वरित खेळासाठी बदली खेळाडू घेता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com