IAF Suryakiran Crashed : कर्नाटकात वायुसेनेचे सूर्यकिरण विमान कोसळले; दोन्ही पायलट सुरक्षित

विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी दोन्ही पायलट बाहेर पडण्यात यशस्वी झाले. अपघातानंतर गावातील लोक घटनास्थळी जमा झाले.
IAF Suryakiran
IAF SuryakiranDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यात गुरुवारी भारतीय हवाई दलाच्या विमानाला अपघात झाला. बोगापुरा गावाजवळ सूर्य किरण ट्रेनर विमान कोसळले. जमिनीवर पडल्यानंतर विमानाचे तुकडे झाले. विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित आहेत. यामध्ये एक महिला पायलटचा समावेश आहे.

नियमित ट्रेनिंग फ्लाइट दरम्यान हा अपघात झाला. विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी दोन्ही पायलट बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हा अपघात का झाला हे जाणून घेण्यासाठी हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. अपघातानंतर गावातील लोक घटनास्थळी जमा झाले. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

इजेक्शन सीटमुळे वैमानिकांचे प्राण वाचले

इजेक्शन सीटमुळे अपघातातून दोन्ही पायलट सुखरूप बचावले. फायटर प्लेनमध्ये इजेक्शन सीट्स बसवल्या जातात. या विमानांचा वेग अतिशय आहे. त्यामुळे पायलटला अपघात झाल्यास प्राण वाचवण्यासाठी फारच कमी वेळ मिळतो.

अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी इजेक्शन सीट विकसित करण्यात आली आहे. पायलट ज्या सीटवर बसतो त्या सीटवर स्फोटके आणि रॉकेटची एक प्रणाली असते जी फक्त लीव्हर खेचून ट्रिगर केली जाते.

जेव्हा पायलटला वाटते की तो विमानावर नियंत्रण ठेवू शकणार नाही आणि अपघात होणार आहे, तेव्हा त्याने इजेक्शन सीटचा लीव्हर ओढला. यामुळे विमानाचा कॉकपिट उघडतो आणि पायलटची सीट विमानातून बाहेर पडते. यानंतर सीटमध्ये बसवलेले पॅराशूट उघडते, ज्याच्या मदतीने पायलट खाली येतो.

IAF Suryakiran
China Drilling Earth : चीन का खोदतोय 32 हजार फूट खोल खड्डा; जाणून घ्या यामागचा प्लॅन

गेल्या महिन्यात मिग-21 विमान कोसळले होते

 विशेष म्हणजे 8 मे रोजी हवाई दलाचे मिग-21 विमान अपघाताला बळी पडले होते. राजस्थानमधील हनुमानगडमध्ये ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत वैमानिक बचावले, मात्र विमान निवासी भागात पडल्याने तीन नागरिकांचा मृत्यू झाला.

मिग-21 हे विमान नियमित प्रशिक्षणासाठी जात होते. यादरम्यान हा अपघात झाला. वैमानिक वेळेत बाहेर काढण्यात यशस्वी झाला. त्याला किरकोळ दुखापत झाली. या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. अपघातानंतर दोन आठवड्यांनंतर हवाई दलाने सर्व मिग-21 विमाने ग्राउंड केली आहेत. मिग-21 हे रशियाने बनवलेले पहिले सुपरसॉनिक फायटर जेट होते. एकेकाळी हे भारतीय हवाई दलाचे प्रमुख विमान होते.

IAF Suryakiran
India-China Crisis: Line of Control वर चीनच्या मोठ्या हालचाली; सॅटेलाइट इमेजद्वारे ड्रॅगनचे कारणामे उघड

सिंगल इंजिन आणि डेल्टा विंग डिझाइन असलेले हे विमान हवेतील वेगासाठी ओळखले जाते. मात्र, त्यामुळे अनेक अपघात होण्याची शक्यता आहे. भारतीय हवाई दलाच्या 400 हून अधिक मिग 21 विमानांचा अपघात झाला आहे. यामुळे अनेक वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळेच या विमानाला फ्लाइंग कॉफिन हे नाव पडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com