मोक्षप्राप्तीसाठी नवऱ्याने बायकोसह तीन मुलांची संपवली जीवनयात्रा

हरियाणातील (Haryana) हिस्सारमध्ये (Hisar) एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Husband suicide with wife and three children for salvation

Husband suicide with wife and three children for salvation

Dainik Gomantak 

Published on
Updated on

हरियाणातील (Haryana) हिस्सारमध्ये (Hisar) एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या कुटुंबातील 4 सदस्यांची हत्या करून आत्महत्या केली (Murder of Family members then suicide). या प्रकरणात, डीआयजी (DIG) यांनी म्हटले, घराचा प्रमुख धार्मिक स्वभावाचा होता आणि मोक्ष मिळविण्यासाठी त्याने संपूर्ण कुटुंबातील सदस्यांची हत्या केली आणि नंतर स्वत: आत्महत्या केली.

दरम्यान, ही घटना हिसारच्या अग्रोहा येथील नांगथाला गावातील आहे. बरवाला रोडवर लोकांनी रमेश नावाच्या व्यक्तीचा मृतदेह पाहिल्यानंतर त्यांना वाटले की, वाहनाची धडक बसल्याने रमेशचा मृत्यू झाला आहे. गावकरी रमेशच्या कुटुंबीयांना माहिती देण्यासाठी गेले असता रमेशची पत्नी सुनीता, दोन मुली आणि एका मुलाचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळ पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले. हिस्सारमध्ये (Hisar) पाच जणांचा मृत्यू झाल्याने आग्रोहा गावात खळबळ उडाली आहे.

<div class="paragraphs"><p>Husband suicide with wife and three children for salvation</p></div>
तेलंगणात पहिल्यांदाच समलिंगी जोडप्याचा थाटात पार पडला विवाह सोहळा

पोलिसांना घटनास्थळावरुन डायरी मिळाली

घटनेची माहिती मिळताच डीआयजी बलवान सिंह राणा (Balwan Singh Rana) घटनास्थळी पोहोचले. डीआयजी बलवान सिंह राणा यांनी सांगितले की, घरमालकाची लिखित डायरी सापडली आहे. तो धार्मिक स्वभावाचा होता आणि मोक्ष मिळविण्यासाठी त्याने संपूर्ण कुटुंबातील सदस्यांची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली.

गाडीसमोर येऊन कुटुंबाला जीव गमवावा लागला

मिळालेल्या माहितीनुसार, घरच्या प्रमुखाने रात्री खीरीमध्ये नशेच्या गोळ्या मिसळून सर्वांना खाऊ घातले. त्यानंतर रात्रीच रस्ता खोदणाऱ्या कुदळीने डोक्यात वार करुन तीन मुले व पत्नीचा खून केला. त्यानंतर त्याने विद्युत प्रवाहाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो करु शकला नाही. यानंतर त्यांनी वाहनासमोर येऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com