Moradabad: नवरा एक अन् बायका दोन, आठवड्यातून तीन दिवस...!

Moradabad News: मुरादाबादमध्ये, एका पुरुषाच्या दोन पत्नींनी आपल्या पतीसोबत राहण्यासाठी आठवड्यातून प्रत्येकी तीन दिवस विभागले आहेत.
Marriage
MarriageDainik Gomantak

Moradabad News: मुरादाबादमध्ये, एका पुरुषाच्या दोन पत्नींनी आपल्या पतीसोबत राहण्यासाठी आठवड्यातून प्रत्येकी तीन दिवस विभागले आहेत. ही परिस्थिती तेव्हा आली जेव्हा कुटुंबात वाद खूप वाढला आणि पत्नीने पोलिसात तक्रार केली. यानंतर हे प्रकरण समुपदेशनासाठी नारी उत्थान केंद्राकडे पाठवण्यात आले.

दरम्यान, नारी उत्थान केंद्रावर कुटुंबीयांच्या उपस्थितीत करार निश्चित करण्यात आला असून, त्यावर तिघांचेही एकमत झाले आहे. या करारानुसार दोन्ही पत्नी त्यांच्या सासरच्या घरी राहतील आणि पती प्रत्येकी तीन दिवस त्यांच्यासोबत राहिल.

Marriage
Swati Maliwal: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा विनयभंग!

तसेच, सोमवार ते बुधवार पती पहिल्या पत्नीसोबत राहणार आहे. तर गुरुवार ते शनिवार तो दुसऱ्या पत्नीसोबत (Wife) राहणार आहे. आठवड्यातून एक दिवस, रविवारी, पती त्याच्या पसंतीच्या कोणत्याही पत्नीसोबत राहू शकतो.

नेमकं प्रकरण काय?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुरादाबाद शहरात राहणाऱ्या एका महिलेने एसएसपी ऑफिसमध्ये तक्रार दाखल केली होती की, '2017 मध्ये लग्न झाल्यानंतर पतीने तिला तिच्या सासरच्या घरी नेले नाही आणि शहरात भाड्याच्या घरात राहायला दिले.'

महिलेच्या (Woman) म्हणण्यानुसार, तिने सासरच्या घरी जाण्याचा हट्ट केला असता पतीने तिला घेऊन जाण्यास नकार दिला. आणि काही दिवसांनी पती अचानक गायब झाला.

Marriage
Lucknow: लखनऊच्या रस्त्यावर तरुण-तरुणीचा फिल्मी स्टाईल रोमान्स, Video Viral

तसेच, पतीचा शोध घेत असताना ती महिला तिच्या सासरच्या घरी पोहोचली, जिथे तिला समजले की पती आधीच विवाहित आहे आणि त्याला पहिल्या पत्नीपासून तीन मुले आहेत. यानंतर महिलेने एसएसपी कार्यालयात हजर राहून तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी (Police) कारवाई करत तिघांनाही समुपदेशनासाठी नारी उत्थान केंद्रात पाठवले.

तर दुसरीकडे, पतीने पत्नीसोबत कोणताही वाद नसल्याचे सांगितले. दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगी आहे. मात्र सासरचे लोक पत्नीबरोबर वाद घालतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com