Lucknow: लखनऊच्या रस्त्यावर तरुण-तरुणीचा फिल्मी स्टाईल रोमान्स, Video Viral

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये चालत्या स्कूटीवर रोमान्स करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.
Video Viral
Video ViralDainik Gomantak
Published on
Updated on

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये चालत्या स्कूटीवर रोमान्स करणाऱ्या तरुण-तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. राजधानीच्या रस्त्यांवर खुलेआम अश्‍लीलता पसरवणाऱ्या या प्रेमीयुगुलांना हजरतगंज पोलिसांनी अटक केली आहे. मुलगी अल्पवयीन आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता पसरवणे यासह अन्य कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खरं तर, लखनऊच्या हजरतगंजमध्ये एका मुलाने आणि मुलीने चालत्या स्कूटीवर असे कृत्य केले की, त्यांचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये मुलगा स्कूटी चालवताना दिसत आहे. तर मुलगी मुलाला मिठीत घेऊन त्याचे चुंबन घेताना दिसत आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यानंतर पोलिसही सक्रिय झाले.

Video Viral
Video Viral: चालत्या गाडीच्या छतावर 'दारु पार्टी', ओव्हरफ्लो जामचा व्हिडिओ व्हायरल!

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल होताच लखनऊच्या हजरतगंज पोलिसांनी तपास सुरु केला. लखनऊ सेंट्रल झोनच्या डीसीपी अपर्णा रजत कौशिक यांनी मंगळवारी संध्याकाळी सांगितले की, व्हिडिओ लखनऊच्या (Lucknow) हजरतगंज भागातील आहे. मुलगा आणि मुलगी फिरायला जाताना दिसत आहेत, या संपूर्ण प्रकरणावर 2 टीम तयार करण्यात आल्या असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

तसेच, बुधवारी सकाळपर्यंत आरोपी मुलाला अटक करण्यात आली होती. लखनऊ पोलिसांचे म्हणणे आहे की, व्हिडिओच्या आधारे हजरतगंज पोलिस ठाण्यात कलम 294, 279 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, आरोपी विक्कीला अटक करण्यात आली आहे, तो चिन्हाटचा रहिवासी आहे. स्कूटीही पोलिसांनी जप्त केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या अल्पवयीन मुलीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Video Viral
Viral Video: 16,000 किलोचा ट्रक चक्क दातांनी ओढला, पठ्याने थेट विश्वविक्रमच केला

लोकांनी हा व्हिडिओ व्हायरल केला

तरुण-तरुणीचा हा फिल्मी स्टाईल रोमान्स काही लोकांनी मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशा प्रकारे रस्त्याने चालणे हे जोडप्यासाठी धोकादायकच नाही तर वाहतुकीच्या नियमांचे खुलेआम उल्लंघन असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com