केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (मंगळवारी) संसदेत 2022 चा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर करत आहेत. आपल्या भाषणाच्या काही मिनिटांतच सीतारामन यांनी स्पष्ट केले की हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांच्या सुधारणांवर भर देणार आहे. अर्थ मंत्री सीतारमण यांनी भारतीय रेल्वेसाठी 2 मोठ्या घोषणा केल्या आहेत. (Railyway Budget 2022 News Updates)
निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सांगितले की, देशात नव्या 400 वंदे भारत ट्रेन्स सुरू केल्या जातील. याचबरोबर देशातील. मेट्रोचे जाळे वाढवणार असल्याचीही घोषणा त्यांनी केली. याअंतर्गत देशातली अनेक शहरांमध्ये मेट्रो ट्रेन सुरू केल्या जातील. पुढील तीन वर्षांत 100 गती शक्ती कार्गो टर्मिनल देखील विकसित केले जातील, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गांची लांबी 2500 किमीपर्यंत वाढवण्याची सरकारची योजना आहे.
भारताच्या पायाभूत विकासाच्या नवीन ब्लू प्रिंटचा एक भाग म्हणून, सीतारमण यांनी प्रधानमंत्री गती शक्ती मास्टरप्लॅनची घोषणा केली, ज्यामध्ये रस्ते, रेल्वे, महामार्ग, बंदरे आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सरकारी खर्च केला जाईल. गेल्या वर्षी अर्थमंत्री सीतारमण यांनी भारतीय रेल्वेसाठी 1.10 लाख कोटी रुपयांचा मोठा निधी जाहीर केला होता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.