
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये OYO ने अविवाहित जोडप्यांच्या प्रवेशाबाबत घेतलेल्या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे. प्रत्येक व्यक्ती या निर्णयावर आपली प्रतिक्रिया देत आहे. अलीकडेच, कंपनीने एक अॅडवायजरी जारी करुन सांगितले की, मेरठमध्ये आतापासून केवळ विवाहित जोडप्यांनाच ओयो हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाईल.
अविवाहित जोडप्यांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, कंपनीच्या या निर्णयाने सर्वत्र एकच खळबळ उडवून दिली. प्रत्येक चौका-चौकात कंपनीकडून घेण्यात आलेल्या या निर्णयावर चर्चा रंगली आहे. देशातील इतर हॉटेलमध्ये (Hotel) रुम घेण्यापूर्वी प्रौढ जोडप्यांना कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज आहे का? हे जाणून घेण्याची लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. चला तर मग अविवाहित प्रौढ जोडप्यांसाठी देशातील कायदा काय सांगतो ते जाणून घेऊया...
जर हॉटेलमध्ये रुम घेण्याबद्दल बोलायचे झाल्यास, तर देशातील कोणत्याही हॉटेलमध्ये रुम घेण्यापूर्वी तुम्हाला तुमचे वैध ओळखपत्र दाखवावे लागते, मग तुम्ही एकटे जात असाल किंवा जोडीदारासोबत. मग अशा स्थितीत प्रश्न पडतो की, अविवाहित जोडप्याला हॉटेलमध्ये रुम घ्यायची असेल, तर त्यासाठी कायदा काय? जर तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे वय 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला हॉटेलमध्ये रुम घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, तुम्ही विवाहित आहात की नाही हे महत्त्वाचे नाही. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार जगण्याचा, राहण्याचा आणि लग्न (Marriage) करण्याचा अधिकार देशाच्या राज्यघटनेने दिला आहे.
राज्यघटनेचे कलम 21 प्रत्येकाला मुक्तपणे जगण्याचा अधिकार देते, ज्याच्या अंतर्गत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही हॉटेलमध्ये खाऊ, पिऊ, राहू शकता. हॉटेलची बाब ही गोपनीयतेची बाब आहे, जिथे तुमच्या गोपनियतेचे कोणीही उल्लंघन करु शकत नाही. परंतु सार्वजनिक ठिकाणी तुम्ही तुमच्या गोपनीयतेच्या अधिकाराबद्दल बोलू शकत नाही. हॉटेलमधील रुम सार्वजनिक मालमत्तेचा भाग नाही, ती खाजगी मालमत्तेच्या अंतर्गत येते. त्यामुळे तिथे तुमच्या गोपनियतेच्या अधिकाराचे कोणीही उल्लंघन करु शकत नाही. तुम्ही प्रौढ असाल तर हॉटेलमध्ये बिंधास्तपणे राहू शकता. देशातील कोणताही कायदा तुम्हाला असे करण्यापासून रोखू शकत नाही. मात्र, यासाठी तुम्हाला तुमचे वैध ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, हॉटेल आणि ट्रॅव्हल बुकिंग दिग्गज कंपनी ओयोने आपल्या ग्राहकांना मोठा झटका देण्याची तयारी केली आहे. आतापासून अविवाहित जोडप्यांना ओयोमध्ये चेक-इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. Oyo ने पार्टनर हॉटेल्ससाठीही नवीन चेक-इन पॉलिसी सुरु केली आहे, जी या वर्षापासून लागू होईल. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अविवाहित जोडप्यांना ओयो हॉटेलच्या रुममध्ये चेक-इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. कंपनीने याची सुरुवात मेरठपासून केली असून त्यासाठी नवा नियम बनवला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.