

हिमाचल प्रदेशातील चंबा-नूरपूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास हा थरार घडला. ककीरा जवळील घार परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने 'इनोवा क्रिस्टा' कार थेट ३०० मीटर खोल दरीत कोसळली. या कारमध्ये गुजरातचे पर्यटक आणि स्थानिक चालक असे एकूण ९ प्रवासी होते. अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
या दुर्दैवी घटनेत पाच पर्यटक आणि एका स्थानिक चालकाचा मृत्यू झाला आहे. मृत पर्यटकांमध्ये गुजरातच्या भावनगर येथील रहिवासी असलेल्या ललितभाई पतनानी, ममताबेन पतनानी, काजल भोपानी, दियान्श भोपानी आणि प्रियंक भोपानी यांचा समावेश आहे. तसेच मंडी जिल्ह्यातील रहिवासी असलेला चालक जसवंत कुमार यालाही आपले प्राण गमवावे लागले आहेत.
अपघाताचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. चंबा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरीतून मृतदेह बाहेर काढले. या अपघातात मयंक पतनानी, फोरमबेन पतनानी आणि जियान्श पतनानी हे तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासानुसार, रात्रीच्या अंधारात किंवा वळणावर गाडीचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सुरू केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.