कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) बी.एस येडियुरप्पा (B.S. Yeddyurappa) यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नोटीस पाठवली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा, मुलगा आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बी.वाय विजयेंद्र (B.Y. Vijayendra) यांना गृहनिर्माण प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराच्या संदर्भात नोटीस पाठवली. तसेच, त्यांच्या कुटुंबातील सदस्य, माजी मंत्री एसटी सोमशेकर आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याविरोधात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
न्यायमूर्ती. एस. सुनील दत्त यादव यांच्या एकल खंडपीठाने कार्यकर्ते टीजे अब्राहम यांच्या याचिकेवर या सर्वांच्या विरोधात नोटिसा बजावण्याचे निर्देश दिले आहेत. 8 जुलै रोजी विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशाला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. विशेष न्यायालयाने तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि तत्कालीन मंत्री सोमशेखर यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी मागणारा खटला फेटाळला होता.
बंगलोरमध्ये एका अपार्टमेंटच्या बांधकामाशी संबंधित प्रकरण
हे प्रकरण बेंगळुरु विकास प्राधिकरणाच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी कथितरित्या लाच घेण्याशी संबंधित आहे. कर्नाटक विधानसभेतही या विषयावर चर्चा झाली जेव्हा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आणि काही गंभीर आरोप केले. त्याचवेळी, येडियुरप्पा आणि त्यांच्या मुलाने हे आरोप जोरदारपणे फेटाळून लावत म्हटले की, या विषयात कोणतेही सत्य नाही. हे प्रकरण बेंगळुरुमध्ये 662 कोटी रुपये खर्च करुन अपार्टमेंट बांधण्याशी संबंधित आहे.
यापूर्वी, अनेक काँग्रेस नेते आरोप करत आले आहेत की येडियुरप्पा, त्यांचा मुलगा, सून आणि जवळचे नातेवाईक या प्रकल्पातील भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या प्रकरणात सहभागी आहे. कोलकात्यातील एका बनावट कंपनीमार्फत लाच मागितली गेली आणि पैसे दिले गेले असा आरोप आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही वेळोवेळी करण्यात आली आहे.
बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी 28 जुलै रोजी कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 26 जुलै 2019 रोजी काँग्रेस-जेडीएस आघाडी कर्नाटक राज्य सरकार पाडल्यानंतर बीएस येडियुरप्पा चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. पण आता कर्नाटकात मुख्यमंत्री बदलल्यानंतर बीएस येडियुरप्पा यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.