National Herald Case: काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे ईडीसमोर हजर

Congress leader Mallikarjun Kharge: नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत.
Congress leader Mallikarjun Kharge
Congress leader Mallikarjun KhargeDainik Gomantak
Published on
Updated on

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. गुरुवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी हेराल्ड हाऊसमध्येच ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजेरी लावली. यासह, ईडीने नॅशनल हेराल्डची होल्डिंग कंपनी यंग इंडियन ( YI) च्या कार्यालयावर पुन्हा छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, 80 वर्षीय खरगे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. दुपारी 12.40 च्या सुमारास खरगे हेराल्ड भवन, बहादूर शाह जफर मार्गावर आयटीओजवळ पोहोचले. त्यानंतर ते ईडी अधिकाऱ्यांसमोर समोर हजर झाले. यंग इंडियनच्या शेअरहोल्डर्समध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही नावे आहेत. काँग्रेस (Congress) अध्यक्षांची कंपनीत 38 टक्के हिस्सेदारी आहे.

Congress leader Mallikarjun Kharge
National Herald Case: यंग इंडियाचे कार्यालय ईडीने केले सील

हेराल्ड हाऊसचा काही भाग सील करण्यात आला

याआधी बुधवारी ईडीने चार मजली हेराल्ड हाऊसचा एक भाग सील केला. यंग इंडियाच्या कार्यालयाची झडती आता थांबवली जाईल. जे काही पुरावे उपलब्ध असतील ते गोळा केले जातील, असे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नॅशनल हेराल्डचे कार्यालय चौथ्या मजल्यावर आहे

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि वेब पोर्टल कार्यालय हेराल्ड हाउस इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्थित आहे, जिथे संपादकीय विभाग आणि प्रशासकीय विभागाचे कर्मचारी काम करतात. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) द्वारे प्रकाशित केले जाते. त्याची होल्डिंग कंपनी यंग इंडियन आहे. वृत्तपत्राचे कार्यालय एजेएलच्या नावाने नोंदणीकृत आहे.

Congress leader Mallikarjun Kharge
National Herald Case: सोनिया गांधींना ED ने बजावले समन्स, '21 जुलै रोजी हजर राहा'

नॅशनल हेराल्डचे कार्यालय चौथ्या मजल्यावर आहे

नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि वेब पोर्टल कार्यालय हेराल्ड हाउस इमारतीच्या चौथ्या मजल्यावर स्थित आहे, जिथे संपादकीय विभाग आणि प्रशासकीय विभागाचे कर्मचारी काम करतात. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) द्वारे प्रकाशित केले जाते. त्याची होल्डिंग कंपनी यंग इंडियन आहे. वृत्तपत्राचे कार्यालय एजेएलच्या नावाने नोंदणीकृत आहे.

Congress leader Mallikarjun Kharge
National Herald कार्यालयावर EDचा छापा, सोनिया अन् राहुल गांधींच्या चौकशीनंतर मोठी कारवाई

मंगळवारी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले

नॅशनल हेराल्ड-एजेएल-यंग इंडियन डीलमध्ये सुरु असलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून ईडीने मंगळवारी हेराल्ड हाऊससह डझनभर ठिकाणी छापे टाकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com