UP Election : 'सत्तेसाठी भाजप तत्त्वांशी तडजोड करत नाही, आमच्यासाठी राष्ट्र सर्वोपरि'

आता गरिबांची पोरंही वैद्यकशास्त्र शिकतील; जेपी नड्डा
BJP national president J P Nadda to visit Uttar Pradesh
BJP national president J P Nadda to visit Uttar PradeshDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी यूपीच्या प्रयागराजमध्ये विरोधकांना चांगलेच धारेवर धरले आहे. समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये गुंडांची दहशत होती, पण 2017 मध्ये भाजपचे सरकार येताच गुंड आणि माफिया पळून गेले आहेत. ही निवडणूक (Election) अखिलेश यादव आणि त्यांच्या गुंडांच्या टोळीला दूर करण्यासाठी आहे.

भाजप (BJP) सरकार सुरक्षेसह विकासाचे मॉडेल पुढे नेत आहे. बारावीनंतर शिकणाऱ्या मुलींना आम्ही स्कूटी देऊ आणि तरुणांना लॅपटॉप देऊ, असा निर्णय घेतला आहे, जेणेकरून तरुणांना शिक्षणाशी जोडून घेता येईल. यासोबतच 7 लाख नोकऱ्याही दिल्या जाणार आहेत.

BJP national president J P Nadda to visit Uttar Pradesh
अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेमुळे चीनमध्ये तणाव

जेपी नड्डा म्हणाले की, राहुल गांधी, अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी यांचा जन्म चांदीचा चमचा घेऊन झाला आहे. ते जन धन योजनेची खिल्ली उडवायचे, कारण त्यांनी गरिबी कधीच पाहिली नाही. आता मोदीजी शेतकऱ्यांना दरमहा 2000 रुपये देत आहेत. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जात आहेत. एकेकाळी उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) केवळ 15 वैद्यकीय महाविद्यालये होती आणि आज 59 वैद्यकीय महाविद्यालये आहेत. आता गरिबांची पोरंही वैद्यकशास्त्र शिकतील आणि गावात राहून अभ्यास करतील. हा बदलणारा भारत असल्याचे ते म्हणाले.

जेपी नड्डा म्हणाले की, निवडणुकीच्या वेळी इतर राजकीय (Political) पक्ष समाजाचे तुकडे करून सत्ता काबीज करण्याचे काम करतात. मग ते सपा, बसपा किंवा काँग्रेस असो. त्यांनी नेहमीच जाती-धर्माची मदत घेऊन आपली खुर्ची सुरक्षित करण्याचे काम केले आहे. सत्तेसाठी भाजप तत्त्वांशी तडजोड करत नाही. आमच्यासाठी राष्ट्र सर्वोपरि आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com