Monsoon Session: दुसऱ्या दिवशीही संसदेचे कामकाज तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवसही गोंधळाचाच होता आणि अखेर मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आला आहे(Monsoon Session)
 The work of Parliament was disrupted on second day also
The work of Parliament was disrupted on second day alsoDainik Gomantak
Published on
Updated on

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा(Monsoon Session) आज दुसरा दिवस आहे. आजही पेगासस(Pegasus) हेरगिरी प्रकरणात संसदेत खळबळ उडालेली पाहायला मिळाली . विरोधी पक्ष या मुद्यावर सरकारला घेराव घालत आहेत. गोंधळामुळे लोकसभा(Parliament) आणि राज्यसभेतील(Rajyasabha) कामकाज सुरू होताच अवघे 4 मिनिटातच तहकूब करावे लागले आहे. (Parliament Monsoon Session)

लोकसभा दुपारी 2 आणि राज्यसभा 11 पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कार्यवाही सुरू होताच सभापती ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या गदारोळावर कठोर भूमिका घेतली. बिर्ला यांनी विरोधकांना ज्या विषयावर त्यांना चर्चा करायची आहे, त्यांना नोटीस देण्यास सांगितले. सरकारने प्रत्येक विषयावर चर्चा करण्याची वचनबद्धता दर्शविली आहे, मग विरोधक घोषणा का देत आहेत. हे योग्य नाही.असे ठाम मत ओम बिर्ला यांनी मांडले आहे.

दरम्यान तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुखेन्दु शेखर रॉय यांनी राज्यसभेत इतर कामकाज स्थगित करून नियम 267 अंतर्गत पेगासस फोन हॅकिंगच्या मुद्यावर त्वरित चर्चेची मागणी केली आहे. हेरगिरी प्रकरणावर टीएमसीच्या खासदारांनी निदर्शने केली असून या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

तर दुसरीकडे सरकारही आपल्या बचावाची तयारी करत असून आयटी मंत्री अश्विनी वैष्णव आज राज्यसभेत या विषयावर विधान करणार आहेत. राज्यसभेत पेगासीसचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी खासदार संसद सिंह यांनीही “झिरो अवर” नोटीस दिली आहे.आयटी मंत्री अश्विनी वैष्णव भारताच्या काही लोकांच्या फोन डेटाच्या हॅकिंगच्या कथित संदर्भात दुपारी 2 वाजता राज्यसभेत सरकारच्या वतीने निवेदन देणार आहेत तर त्यांनी काल लोकसभेतही आपले निवेदन सादर केले होते.

दरम्यान विरोधकांनी केलेल्या या आरोपाचे खंडन करत अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, या आरोपात कोणतेही तथ्य नसून ही एक रचलेली कथा असून पोर्टलच्या अहवालात असे म्हटले आहे की केवळ फोन नंबर अस्तित्त्वात आला आहे असे म्हणता येणार नाही. वृत्तानुसार अश्विनी वैष्णव यांचे नावही त्या यादीमध्ये नमूद होते मात्र ते त्यावेळी मंत्री नव्हते.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवसही गोंधळाचाच होता आणि अखेर मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आला आहे . इंधनाचे दर, शेतकरी आंदोलन, पेगासस हेरगिरी यासह इतर विषयांवर विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत आणण्याचा प्रयत्न केला. या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही सभागृहे अनेक वेळा तहकूब करण्यात आली. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

 The work of Parliament was disrupted on second day also
पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार विरोधी पक्षांना प्रेझेंटेशन

दरम्यान पेगासस प्रकरणी आज विरोधकांनीही एक बैठक घेतली आहे ज्यामध्ये कॉंग्रेस, टीएमसी, आरजेडी, द्रमुक आणि अन्य पक्षाचे खासदार उपस्तिथ होते आणि या बैठकीत दोन्ही सभागृहात पेगाससचा मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णयही विरोधकांनी घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com