'Corona' नंतर आता 'H3N2' फ्लू ची दहशत, 'या' लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष

कोरोना विषाणुनंतर दिल्लीत H3N2 चे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
'Corona| H3N2
'Corona| H3N2Dainik Gomantak
Published on
Updated on

H3N2 Symptoms Precautions: देशात कोरोना महामारीनंतर H3N2 खूप वेगाने पसरत आहे. जवळपास प्रत्येक घरात या विषाणुचे रुग्ण आढळून येत आहेत. या विषाणूची लक्षणेही कोरोना (Corona) महामारीसारखीच आहेत. यामुळे डॉक्टरांनी लोकांना मास्क घालण्याचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची बैठक

H3N2 विषाणूचे सतत वाढत असलेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी आरोग्य तज्ज्ञांसोबत बैठक घेतली आणि फ्लूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ते टाळण्यासाठी उपायांवर चर्चा केली. दिल्लीत गेल्या महिन्यापासून याचे प्रकरणे वाढली आहेत. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठी ते अधिक धोकादायक ठरू शकते.

  • H3N2 म्हणजे काय?

H3N2 विषाणू हा इन्फ्लूएंझा A चा उपप्रकार आहे. जो झपाट्याने बदलतो आणि लोक त्याला बळी पडतात. या विषाणूला हाँगकाँग फ्लू असेही म्हणतात. हा H1N1 सारखाच एक विषाणू आहे. जो पूर्वी प्राण्यांमध्ये आढळत होता आणि आता तो मानवांना संक्रमित करत आहे. हा विषाणू आपल्या शरीरात तयार होणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशी (WBC) कमी करतो, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो.  
 
H3N2 इन्फ्लूएंझाची लक्षणे कोणती?

- श्वासोच्छवासाचा त्रास
- सतत ताप येणे
- छाती किंवा पोटदुखी
- स्नायू दुखणे
- अशक्तपणा आणि चक्कर येणे
- जुन्या आजाराची पुनरावृत्ती
- सर्दी आणि खोकला

  • H3N2 व्हायरस या लोकांसाठी अधिक धोकादायक

- 5 वर्षांखालील लहान मुले
- 65 वर्षांपेक्षा जास्त वयाची वृद्ध
- गर्भवती महिला
- श्वसन आणि दमा रुग्ण
- मधुमेह रुग्ण
- कर्करोग रुग्ण

H3N2 व्हायरस पासून असा करावा बचाव

  1. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे

  2. खोकताना आणि शिंकताना नाकाला रुमाल लावावा

  3. प्रदूषित ठिकाणी जाणे टाळावे

  4. बाहेर तळलेल्या पदार्थांचे सेवन टाळावे

  5. हात नेहमी धुत रहावे

  6. जास्त पाणी प्यावे

  7. ताप आल्यास पॅरासिटामॉल घ्यावी.

  8. ताप 2-3 दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com