World Lion Day 2023:
World Lion Day 2023: Dainik Gomantak

World Lion Day 2023: देशातील सिंहांच्या संख्येत सातत्याने वाढ; जागतिक सिंह दिनानिमित्त PM मोदींनी केले 'हे' आवाहन...

आज जागतिक सिंह दिन साजरा केला जात असून पंतप्रधान मोदींनी ट्विट करून सिंहांचे रक्षण करणाऱ्या सर्व लोकांचे कौतुक केले आहे.
Published on

World Lion Day 2023: आज जागतिक सिंह दिन साजरा केला जात आहे. सिंहांच्या संवर्धन आणि संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस दरवर्षी 10 ऑगस्ट ला जगभरात साजरा केला जातो. या दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विट करून सिंहांच्या अधिवासाचे रक्षण करणाऱ्या सर्व लोकांचे कौतुक केले असून देशातील सिंहांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, "जागतिक सिंह दिन हा त्यांच्या पराक्रमाने आणि वैभवाने आपल्या हृदयाचा ताबा घेणाऱ्या भव्य सिंहांचा उत्सव साजरा करण्याचा एक प्रसंग आहे. भारताला आशियाई सिंहांचे घर असल्याचा अभिमान आहे आणि गेल्या काही वर्षांत भारतात सिंहांची संख्या वाढली आहे.

सिंहांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सिंहांच्या अधिवासाचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचे मी कौतुक करतो. पुढील पिढ्यांसाठी त्यांची भरभराट होत राहावी यासाठी आपण त्यांचे पालनपोषण आणि संरक्षण करत राहू या."

World Lion Day 2023:
Earthquake In Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टल स्केलवर 3.4 तीव्रता

गुजरातमध्ये विविध कार्यक्रमांद्वारे जागतिक सिंह दिन साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत जागतिक सिंह दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम वर्चुअल माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहे.

सौराष्ट्रातील दहा जिल्ह्यांतील आठ हजार पाचशेहून अधिक शैक्षणिक संस्थांमध्ये या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे लायन इन्फॉर्मेशन वेब अॅपचे उद्घाटन करतील आणि वर्चुअल माध्यमातून लायन अँथम लाँच करतील.

जगातील एकमेव आशियाई सिंहांची संख्या भारतात आहे. हे सिंह गुजरातच्या गीर वन राष्ट्रीय उद्यानात आढळतात. भारत सरकार आणि इतर-सरकारी संस्थांच्या संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे अलिकडच्या वर्षांत आशियाई सिंहाची संख्या सातत्याने वाढत आहे.

सिंह बद्दल या गोष्टी माहिती आहे का?

सिंहाचे वजन 190 किलोपर्यंत आणि सिंहाचे वजन 130 किलोपर्यंत असते.

सिंहाचे वय 16 ते 20 वर्षे असते. 

सिंहाची ऐकण्याची क्षमता खूप जास्त असते.

भारताचे राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभातील सिंहाची प्रतिमा आहे.

सिंह मांजरीच्या प्रजातीमध्ये येतात, म्हणून त्यांना मोठ्या मांजरी म्हणतात.

नर सिंहाच्या मानेवर केस असतात, परंतु मादी सिंहाच्या मानेवर केस नसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com