Cyber Fraud: मॅट्रीमोनी साइट, मैत्री अन् व्हिडिओ कॉल; ब्रिटनचा इंजीनियर झटक्यात झाला कंगाल

Cyber Fraud: पीडिताने पोलिसांना सांगितले की, जेव्हा त्याने तिच्या खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात केली तेव्हाच तिचे खरे नाव कळले.
Cyber Fraud
Cyber FraudDainik Gomantak
Published on
Updated on

Software Engineer Based in UK was Extorted For over Rs 1.1 Crore:

ब्रिटनमधील सॉफ्टवेअर इंजीनियरला एका महिलेने लग्नाचे आमिष दाखवत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. यासाठी महिलेने इंटरनेट, मॅट्रीमोनी साइट आणि सायबर क्राईमच्या अनेक युक्त्यांचा वापर केला.

या महिलने पहिल्यांदा इंजीनियरशी मॅट्रिमोनी साइटद्वारे मैत्री केली. त्यानंतर सातत्याने व्हिडिओ कॉलमध्ये स्वत: ला विवस्त्र करून इंजीनियरला लैंगिक सुखाचे आमिष दाखवू लागली. याचाच फायदा घेत तिने इंजीनियरला 1 कोटीहून अधिक रुपयांना गंडा घातला.

व्हाईटफिल्ड सीईएन गुन्हे पोलिसांना महिलेच्या खात्यातील 84 लाख रुपये गोठवण्यात यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनायटेड किंगडममध्ये काम करणारा ४१ वर्षीय सनी (नाव बदलले आहे), सध्या केआर पुरममध्ये राहायला आहे. त्याचे बेंगळुरूला सध्या प्रशिक्षण सुरू आहे.

त्याने लग्नासाठी मॅट्रीमोनी वेबसाइटवर नोंदणी केली होती. बनावट प्रोफाइल असलेल्या एका महिलेने साइटवर त्याच्याशी मैत्री केली.

काही दिवस मेसेजची देवाणघेवाण केल्यानंतर दोघांनी त्यांचे मोबाईल नंबर शेअर केले. महिलेने सनीशी लग्न करण्यास रस दाखवला.

तिने इंजीनियरला सांगितले की तिच्या वडीलांचे निधन झाले आहे. आणि ती तिच्या आईसोबत राहत आहे.

2 जुलै रोजी, तिने त्याला फोनवर बोलावले आणि तिच्या आईच्या उपचारासाठी त्याच्याकडून 1,500 रुपये उसने घेतले.

Cyber Fraud
Social Media: फेसबुकवर लैंगिक छळ करणाऱ्याला हाय कोर्टाकडून 50 झाडे लावण्याची शिक्षा

4 जुलै रोजी सकाळी 12 च्या सुमारास तिने त्याला व्हिडिओ कॉल केला. तिने सनीशी बोलताना तिचे कपडे काढले आणि त्याच्या नकळत कॉल रेकॉर्ड केला.

नंतर तिने ही क्लिप त्याला पाठवली आणि ती त्याच्या पालकांना पाठवण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीने सनीने 1 कोटी 14 लाख रुपये दोन बँक खात्यांमध्ये आणि महिलेने दिलेल्या चार मोबाइल नंबरवर ट्रान्सफर केले.

सनीने पोलिसांना सांगितले की, जेव्हा त्याने तिच्या खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात केली तेव्हाच तिचे खरे नाव कळले. अधिक पैशासाठी ती त्याला ब्लॅकमेल करत राहिल्याने त्याने पोलिसात तक्रार दाखल केली.

"आम्ही माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत केस हाती घेतली आहे आणि आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न करत आहोत. तिने लोकांकडून पैसे उकळण्याच्या एकमेव उद्देशाने बनावट नावाने मॅट्रीमोनी प्रोफाइल तयार केले असावे," असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Cyber Fraud
UP Crime News: अपहरण, मित्रांसह चार दिवस बलात्कार अन् निर्जन रस्ता; मामाच्या मुलाने तरुणीशी केलेल्या कृत्यांनी कानपूर हादरले

एस गिरीश, पोलीस उपायुक्त (व्हाइटफील्ड), म्हणाले "आम्ही या महिलेच्या खात्यातील सुमारे 84 लाख रुपये गोठवण्यात यशस्वी झालो आहोत. तिने 30 लाख रुपये वापरले आहेत.

कोणत्याही व्यक्तीशी ऑनलाइन व्यवहार करताना लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. अशा कॉल्सला उत्तर देऊ नये. कॉलरने अयोग्य वर्तन केल्यावर त्यांनी तो डिस्कनेक्ट केला पाहिजे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com