Haryana Assembly Election: सत्तेचं स्वप्न भंगल पण, मुस्लिमबहुल जागांवरील काँग्रेसच्या विजयात रोहिंग्यांनी बजावली भूमिका?

Congress Victory in Muslim-majority Areas: हरियाणाच्या मेवात भागात विधानसभेच्या पाच जागा आहेत. ज्यामध्ये नूह, पाहना आणि फिरोजपूर झिरका या नूह जिल्ह्यातील जागा आहेत.
Muslims
MuslimsDainik Gomantak
Published on
Updated on

Haryana News: हरियाणा विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्या पराभवामुळे काँग्रेसचे पुन्हा सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगले. अनेक जाट बहुल जागांवर पक्षाचा पराभव झाला, ज्यांना ते आपला बालेकिल्ला मानत होते. पण, मेवात भागात त्यांना मिळालेला विजय हा संपूर्ण हरियाणाच्या मतदारांनी दिलेल्या जनादेशाच्या विरुद्ध आहे. या प्रदेशात जवळपास 80 टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे आणि नूह जिल्ह्यातील तिन्ही जागांवर काँग्रेस उमेदवारांचे विजयाचे अंतर मोठे आहे.

हरियाणाच्या मेवात भागात विधानसभेच्या पाच जागा आहेत. ज्यामध्ये नूह, पाहना आणि फिरोजपूर झिरका या नूह जिल्ह्यातील जागा आहेत. तर सोहना गुरुग्राम आणि हातीन विधानसभा जागा पलवल जिल्ह्याचा भाग आहेत. यातील नूह जिल्ह्यातील तीनही जागा मुस्लिमबहुल आहेत. या दोन्हीमध्ये ते बहुतांश वेळा निर्णायक भूमिका बजावत आले आहेत.

Muslims
Boiler blast in Haryana: हरियाणातील लाईफ लाँग कारखान्यात बॉयलरचा स्फोट, 50 हून अधिक कर्मचारी भाजले

रोहिंग्या मुस्लिमांना नूहमध्ये कायमचे रहिवासी कोणी केले?

नूह विधानसभेत 1.5 लाखांहून अधिक मतदार आहेत, त्यापैकी सुमारे 60 हजार मतदार हिंदू आहेत. बाकी सर्व मुस्लिम आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, येथील अनेक गावात रोहिंग्या मुस्लिम कायमस्वरुपी स्थायिक झाले आहेत. काही 10 ते 15 वर्षांपासून राहत आहेत. मतदारही झाले आहेत. येथे ते मुलींचे विवाहही लावत आहेत. आयोजकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये परिस्थितीची वास्तविकता असल्याचा दावा करण्यात आला आहे.

फिरोजपूर झिरका येथे पुन्हा रोहिंग्या मुस्लिम!

त्याचप्रमाणे, 2 लाख मतदारांपैकी केवळ 25,000 ते 30,000 हिंदू मतदार आहेत. बाकी सर्व मुस्लिम आहेत. हे रोहिंग्या मुस्लिमांचे निवासस्थान असल्याचेही सांगितले जात आहे. फिरोजपूर झिरकाची कहाणी काही वेगळी नाही. या जागेवरील 2.47 लाख मतदारांपैकी केवळ 25 ते 30 हजार हिंदू आहेत, उर्वरित मुस्लिम मतदार आहेत.

Muslims
Punjab and Haryana High Court: "महिलेच्या आत्महत्येस सासरचेच जबाबदार असतील असे नाही"; आरोपींना मुक्त करत, कोर्ट म्हणाले...

रोहिंग्या मुस्लिमांमुळे काँग्रेसला मोठा विजय?

या निवडणुकीत नूह येथील काँग्रेसचे उमेदवार आफताब अहमद 46,963 मतांनी विजयी झाले आहेत. तर फिरोजपूर झिरका येथे काँग्रेसच्या मामन खान यांचा 98,441 मतांनी अनपेक्षित विजय झाला. नूह येथील दंगलीदरम्यान जमावाला भडकावल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. तसेच, पन्ना येथे काँग्रेसचे मोहम्मद इलियास 31916 मतांनी विजयी झाले आहेत.

काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद इस्रायल यांनीही हातिन मतदारसंघात 32396 मतांनी विजय मिळवला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहिंग्या स्वत: सांगत आहेत की, ते भारतात कसे आले आणि इथेच राहिले. या प्रदेशात काँग्रेसच्या उमेदवारांनी अनपेक्षित आघाडी घेतल्याने इतर देशांतून आलेल्या बेकायदेशीर घुसखोरांचा यात मोठा हात असल्याची शंका निर्माण होते. त्यांच्या मतदार होण्यामागे कोणाचे षडयंत्र आहे, हाही प्रश्न आहे. कोणत्याही पक्षाला निवडणूक फायदा मिळवून देण्यासाठी हे सर्व केले जात आहे का?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com