ENG vs NZ 1st ODI: इंग्लंडच्या हॅरी ब्रूकचा महाविक्रम! 32 वर्षांपूर्वीचा रॉबिन स्मिथचा मोडला रेकॉर्ड; एकाकी लढत देऊन ठोकले 'दमदार शतक' VIDEO

Harry Brook Record: हॅरी ब्रूकने 101 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 11 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 135 धावांची खेळी खेळली.
Harry Brook Record
Harry Brook Dainik Gomantak
Published on
Updated on

Harry Brook Record: इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात (ODI Match) इंग्लंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 223 धावांपर्यंत मजल मारली. या सामन्यात कर्णधार हॅरी ब्रूक (Harry Brook) आणि जेमी ओवरटन वगळता इंग्लंडच्या इतर सर्व फलंदाजांनी अत्यंत खराब प्रदर्शन केले. मात्र, ब्रूकने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावरच इंग्लंडचा संघ सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला.

इंग्लंडची अत्यंत खराब सुरुवात

दरम्यान, इंग्लंडच्या (England) डावाची सुरुवात खूपच खराब झाली. जेमी स्मिथ खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर बेन डकेट, जो रुट आणि जॅकब बेथल हे अनुभवी फलंदाजही मोठी खेळी करु शकले नाहीत. केवळ 10 धावांवरच इंग्लंडने आपले 4 महत्त्वाचे फलंदाज गमावले. त्यामुळे इंग्लंडचा संघ खूपच कमी धावसंख्येवर गुंडाळला जाईल, असे वाटत होते. परंतु, इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक काहीतरी वेगळ्याच इराद्याने मैदानात उतरला होता. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अजिबात दयामाया न दाखवता एकहाती फलंदाजी करत संघाला सावरले.

Harry Brook Record
IND vs NZ 1st ODI Match: केएल राहुल आऊट, आता 'या' खेळाडूला मिळणार प्लेइंग 11 मध्ये स्थान

हॅरी ब्रूकचे दमदार शतक

हॅरी ब्रूकने 101 चेंडूंमध्ये 9 चौकार आणि 11 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 135 धावांची खेळी खेळली. धावा करताना त्याने कोणतीही गडबड न करता शांत आणि दमदार शैलीत शतक झळकावले. एका बाजूला नियमितपणे विकेट्स पडत असतानाही ब्रूक क्रीजवर एकाकी उभा राहिला आणि याचमुळे इंग्लंडचा संघ आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला.

Harry Brook Record
IND vs ENG 1st Test: देवाची इच्छा असेपर्यंत...! इंग्लंडचे बारा वाजवल्यानंतर जसप्रीत बुमराह असं का म्हणाला?

ब्रूकने मोडला 32 वर्षांपूर्वीचा रॉबिन स्मिथचा विक्रम

इंग्लंडच्या एकूण 223 धावांच्या धावसंख्येपैकी एकट्या हॅरी ब्रूकने 135 धावांचे योगदान दिले. याचा अर्थ, इंग्लंडच्या डावातील एकूण 60.53% धावा एकट्या ब्रूकने केल्या, जो इंग्लंडसाठी एक नवा राष्ट्रीय विक्रम आहे. ब्रूकने 32 वर्षांपूर्वीचा इंग्लंडचा माजी फलंदाज रॉबिन स्मिथ (Robin Smith) याचा विक्रम मोडीत काढला. 1993 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) वनडे सामन्यात इंग्लंडने 277 धावा केल्या होत्या, त्यापैकी रॉबिन स्मिथने 167 धावा करत डावातील एकूण 60.28% धावा केल्या होत्या. आता हॅरी ब्रूक एका वनडे डावात सर्वाधिक टक्केवारीच्या धावा करणारा इंग्लंडचा फलंदाज बनला आणि त्याने 32 वर्षांपूर्वीचा हा मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com