
Hardik Pandya New Look Photos
आशिया कप २०२५ फक्त काही दिवसांवर आला असून, क्रिकेटप्रेमींच्या हृदयाची धडधड वाढली आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी टीम इंडियाचे खेळाडू दुबईत दाखल झाले आहेत. ८ संघांमध्ये रंगणाऱ्या या क्रिकेट महायुद्धात सर्वांचे लक्ष भारताच्या स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याकडे असेल. तो १० सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध मैदानात उतरणार आहे. मात्र, सामन्यांपूर्वीच हार्दिक एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
मैदानावर जोरदार षटकार आणि प्रभावी गोलंदाजीने सामन्याचा रंग बदलणारा हार्दिक, मैदानाबाहेर त्याच्या फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. दुबईला रवाना होण्यापूर्वी हार्दिकने एक नवीन हेअरकट केला त्याने केसांना पांढरा रंग दिला आहे.
हा फ्रेश आणि आकर्षक लूक त्याच्यावर खुलून दिसतोय. चाहत्यांनी त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंना प्रचंड प्रतिसाद दिला असून, काही तासांतच ते व्हायरल झाले आहेत. अनेक चाहते म्हणत आहेत की, पहिल्या नजरेत हार्दिकला ओळखणंही कठीण होतं.
हार्दिक जेव्हा मैदानावर असतो, तेव्हा त्याची आक्रमक फलंदाजी, झटपट विकेट घेणारी गोलंदाजी आणि प्रभावी फिल्डिंग सामन्याचा प्रवाह बदलते. तर मैदानाबाहेर तो कायमच फॅशन आणि स्टाईलच्या चर्चेत असतो.
त्याचे कपडे, ज्वेलरी, टॅटू आणि हेअरस्टाईल नेहमीच चाहत्यांच्या नजरा खिळवतात. आशिया कपपूर्वी त्याचा हा नवीन लूक पुन्हा एकदा सिद्ध करतो की तो केवळ क्रिकेटपटू नाही तर फॅशन आयकॉनही आहे.
आशिया कप २०२५ मध्ये हार्दिकवर मोठी जबाबदारी असेल. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणे आणि तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून ओव्हर्स पूर्ण करणे, या दोन्ही भूमिका त्याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पॉवरप्लेमध्ये विकेट घेण्याची आणि डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी गोलंदाजी करण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी तो "एक्स-फॅक्टर" ठरू शकतो.
हार्दिक पंड्या गेल्या नऊ वर्षांपासून भारतीय संघाचा भाग आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ११ सामने खेळून १७ विकेट्स घेतल्या आणि ५३२ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ९४ सामन्यांमध्ये त्याने ९१ विकेट्स मिळवल्या आणि १९०४ धावा ठोकल्या आहेत.
तर टी-२० फॉरमॅटमध्ये ११४ सामन्यांत १८१२ धावा आणि ९४ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. कसोटी संघातून बाहेर पडलेला हार्दिक, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र संघाचा अविभाज्य घटक ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.