
भारतीय क्रिकेटचा सर्वात आक्रमक आणि करिष्माई अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा हार्दिक पांड्या हा केवळ मैदानावरील त्याच्या परफॉर्मन्समुळेच नव्हे तर त्याच्या आलिशान जीवनशैलीमुळे आणि करोडोंच्या कमाईमुळे देखील सतत चर्चेत राहतो. क्रिकेट, ब्रँड एंडोर्समेंट, रिअल इस्टेट आणि लक्झरी कार कलेक्शनमुळे हार्दिकची संपत्ती झपाट्याने वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२५ पर्यंत त्याची एकूण निव्वळ संपत्ती ₹९० ते ₹९५ कोटी इतकी असल्याचा अंदाज आहे.
हार्दिक पांड्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत (BCCI) ग्रेड-ए करार आहे. या कराराअंतर्गत त्याला दरवर्षी ₹५ कोटी रुपयांचा निश्चित पगार मिळतो. याशिवाय, प्रत्येक सामन्यासाठी त्याला मॅच फी मिळते. टेस्ट, वनडे किंवा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळताना ही रक्कम वेगळी असते. पंड्या मुख्यत्वे वनडे आणि टी-२० सामन्यांमध्ये सक्रिय असल्याने, या फॉरमॅटमधूनच त्याच्या उत्पन्नाचा मोठा भाग मिळतो.
हार्दिक पांड्यासाठी इंडियन प्रीमियर लीग (IPL) हा मोठा उत्पन्नाचा स्रोत ठरला आहे. गुजरात टायटन्सला पहिला आयपीएल किताब जिंकवून देणारा हा खेळाडू आता पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे.
२०२५ च्या आयपीएल हंगामासाठी मुंबई इंडियन्सने त्याला ₹१६.३५ कोटी रुपयांना कायम ठेवले आहे. ही रक्कम त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक असून, त्याच्या एकूण संपत्तीत मोठे योगदान देते.
हार्दिक अनेक मोठ्या ब्रँड्सचा चेहरा आहे. त्याने BOAT, Dream11, Hyundai, Van Heusen, Gulf Oil यांसारख्या नामांकित ब्रँडसाठी जाहिराती केल्या आहेत.
अहवालांनुसार, प्रत्येक ब्रँड एंडोर्समेंटमधून त्याला ₹२ ते ₹३ कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. तसेच, त्याने काही स्टार्टअप्स आणि फॅशन कंपन्यांमध्ये इक्विटी शेअर घेतले आहेत, ज्यामुळे त्याचे आर्थिक पोर्टफोलिओ आणखी मजबूत झाले आहे.
हार्दिकने त्याची कमाई केवळ खर्च न करता योग्य पद्धतीने गुंतवली आहे.
मुंबईतील वांद्रे परिसरात ₹३० कोटी रुपयांचे आलिशान अपार्टमेंट
वडोदरा येथे त्याचे लक्झरी पेंटहाऊस
ही दोन्ही घरे त्याच्या आलिशान जीवनशैलीचे प्रतीक आहेत.
हार्दिकच्या गॅरेजमध्ये काही जगातील सर्वात महागड्या गाड्या आहेत:
Rolls-Royce
Mercedes-AMG G63
Range Rover Vogue
Porsche Cayenne
या सर्व गाड्यांची एकत्रित किंमत कोट्यवधींमध्ये जाते.
हार्दिकला घड्याळांचा अफाट शौक आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये
₹५० कोटी किमतीचे Richard Mille RM 56-03 Blue Sapphire,
Rolex Daytona,
आणि Audemars Piguet Royal Oak
यांसारखी जगप्रसिद्ध घड्याळे आहेत.
आशिया कपनंतर मैदानावरील कामगिरीपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. नुकतीच हार्दिकने तब्बल ४.५ कोटी रुपयांची लक्झरी लँबॉर्गिनी कार खरेदी केली असून, त्याच नव्या गाडीत तो आपल्या नव्या गर्लफ्रेंडसोबत फिरताना दिसला आहे.
या दोघांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक आणि त्याची कथित गर्लफ्रेंड मुंबईच्या रस्त्यांवर नव्या लँबॉर्गिनीतून सफर करताना दिसत आहेत. त्यांच्या या क्लिपवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.